Source :- BBC INDIA NEWS

आग आणि धुराचे लोट.

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ परिसरात रविवारी भीषण आग लागल्याचं पाहायला मिळालं. सिलेंडर ब्लास्टमुळं ही आग लागल्याची माहिती पोलिसांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

दरम्यान या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नसल्याचंही अधिकारी आणि पोलिसांनी म्हटलं आहे.

महाकुंभ परिसरातील सेक्टर 19 च्या भागामध्ये दोन सिलिंडरलचा स्फोट झाला. त्यामुळं त्याठिकाणी असलेल्या तंबूंमध्ये आग पसरली अशी माहिती आखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी भास्कर मिश्रा यांनी दिली.

अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या आग धूर आणि विस्तव पूर्णपणे शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडूनही याबाबत माहिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी घटनेची दखल घेतली असून, आगीवर नियंत्रण मिळाल्याचं सांगण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून, यात कोणीही जखमी नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

याबाबत महा कुंभमेळा चे पोलिस महानिरीक्षक वैभव कृष्णा यांनीही माहिती दिली. गीता प्रेसच्या काही तंबूंमध्ये आग लागली. पण आखाड्यांमध्ये आग लागलेली नाही. यात कोणतीही हानी झालेली नाही. घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही, असं ते म्हणाले.

Twitter पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Twitter पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Twitterवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

प्रयागराजचे जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, “साडेचारच्या सुमारास गीता प्रेसच्या तंबूत आग लागल्याची माहिती मिळाली. त्यासोबतच 10 तंबूंमध्ये आग लागल्याची माहिती होती. लगेचच अग्निशमन पथकं याठिकाणी पोहोचले आणि परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवलं.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC