Source :- BBC INDIA NEWS
अवनी लेखरा : तीन पॅरालिम्पिक मेडल्स जिंकणारी पहिली भारतीय महिला, असा आहे प्रवास
1 तासापूर्वी
23 वर्षांची अवनी लेखरा ही 3 पॅरालिम्पिक मेडल्स जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. 2020 साली पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर तिने 2024 साली सुवर्णपदक जिंकलं. 2015 साली शाळेची उन्हाळ्याची सुटी सुरू असताना अवनीची शूटिंगशी ओळख झाली.
छंदाचं रूपांतर ध्यासात झालं आणि ती राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिंकू लागली.
हा खेळ खेळताना गेल्या 12 वर्षांत अवनीने 3 वर्ल्डकपमध्ये सहभागी होत सुवर्ण – रौप्य आणि कांस्य पदकं जिंकली आहेत.
अवनीला बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्करासाठी नामांकन मिळालं आहे.
SOURCE : BBC