Source :- ZEE NEWS

Aliens News : एलियन खरचं अस्तित्वात आहेत का की याबाबत नेहमीच अनेक तर्क वितर्क मांडले जातात. इतर ग्रहांवर एलियन आहेत का? एलियन  मानवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे का? असे अनेक प्रश्न एलियन्सच्या अल्तित्वाचे गूढ वाढवता. अनेक शास्त्रज्ञ हे गूढ उलगडण्याचा प्रयत्न  करत आहेत. दुसरीकडे, अमेरिकन गुप्तहेर संस्थेच्या अहवालामुळे खळबळ उडाली आहे. एलियन्सने बटण दाबून  23 सैनिकांना दगड बनवल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. 

अमेरिकन आणि रशियन सैनिकांना एलियन्सचा सामना करावा लागला आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या एका कागदपत्रातून ही धक्कादायक माहिती  समोर आली आहे. एलियन आणि सोव्हिएत रशियाच्या सैन्यात युद्ध झाले आहे, ज्याचा परिणाम भयानक होता असाही दावा केला जात आहे.

अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने काही धक्कादायक कागदपत्र सार्वजनिक केली आहेत. यात रशियान सैन्याबाबत धक्कादायक माहिती आहे. अमेरिकन गुप्तहेरा संस्थेने जवळपास 35 वर्षांपूर्वीच्या घटनेचा तपशीलवार उल्लेख केला आहे. यात यूएफओमधून बाहेर पडून एलियन्सनी केलेल्या कथित हत्याकांडाची कहाणी लिहिली आहे. 

या अहवालानुसार, एलियन्सनी रशियन सैनिकांच्या एका तुकडीचे दगडात रूपांतर केले होते. अहवालानुसार 35 वर्षांपूर्वी, तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या सैनिकांनी सायबेरियातील सोव्हिएत लष्करी तुकडीवर घिरट्या घालणारा एक UFO, म्हणजेच उडणारी तबकडी पाडली होती.  या अहवालातून हे सिद्ध होते की पृथ्वीला भेट देणाऱ्या एलियन्सकडे अमेरिकन सरकारच्या ‘गृहीतकांपेक्षा’ जास्त शस्त्रे आणि तंत्रज्ञान होते सीआयएने म्हटले आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, एलियन्सनी यूएफओचे नुकसान केल्यानंतर जे घडले ते भयानक होते. सीआयए एजंट्सनी 250 पानांच्या गुप्त फाईलचा हवाला देऊन केलेल्या खुलाशानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की रशियन सैन्याच्या हल्ल्यात नष्ट झालेल्या यूएफओ किंवा एलियन वाहनातून 5 एलियन बाहेर आले. या एलियननी जे केले ते यापूर्वी कुठेही पाहिले किंवा ऐकले नव्हते. 

गेल्या 80 वर्षांत या हत्याकांडात सहभागी असलेल्या एलियन्सचा उल्लेख अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. याची प्रतिकात्मक छायाचित्रे देखील अहवालासह प्रसिद्ध करण्यात आली आहेत. एलियन्सनी भयानक स्फोट घडवून सोव्हिएत रशियाच्या सैनिकांना  दगडात रूपांतरित केले असे सीआयएच्या फाइल रिपोर्टमध्ये म्हंटले आहे.  

 एलियन त्यांच्या नष्ट झालेल्या यूएफओमधून बाहेर आले आणि त्यापैकी एकाने स्वतःला एका प्राण्यामध्ये परावर्तित केले. एलियन्सनी अचानक एक तीव्र ऊर्जा सोडली आणि 23 रशियन सैनिकांना दगडात रूपांतरित केले. या  23 सैनिकांचे अवशेष आणि अंतराळयानाचे अवशेष मॉस्कोजवळील एका गुप्त संशोधन तळावर नेण्यात आल्याचेही या गुप्त अहवालात म्हंटले आहे.

सन 2000 मध्ये सार्वजनिक झालेला हा दस्तऐवज अलीकडेच एआय किंवा एव्हिल पॉडकास्टचा विषय होता.  होस्ट जोश हूपर यांनी आपण यूएफओ क्रॅश साइटवर उपस्थित असलेले दोन सैनिक प्रत्यक्षात चकमकीतून वाचले त्यापैकी एक असल्याचा दावा केला आहे.

SOURCE : ZEE NEWS