Source :- ZEE NEWS

Earth final days : पृथ्वीचा विनाश हा अटक आहे. पृथ्वीचा शेवट कधी आणि कसो होणार याबाबत अनेक दावे करण्यात आली आहे. आता मात्र, पृथ्वीच्या विनाशाची भयानक टाईमलाईन समोर आली आहे. 999,999,996 वर्षानंतर जगणं मुश्लिक होणार आणि 1,000,002,021 वर्षानंतर अस्तित्व मिटणार अशी ही टाईमलाईन आहे. 

पृथ्वीच्या विनाशाचा दिवस अजून खूप दूर आहे. मात्र, त्यााधी शास्त्रज्ञांनी  भयानक इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांच्या एका पथकाने सुपरकॉम्प्युटर-चालित गणितीय मॉडेल्सचा वापर करून पृथ्वीवरील जीवनाच्या अंतिम अंतासाठी एक टाइमलाइन विकसित तयार केला आहे. नासाने हे संशोधन जपानमधील तोहो विद्यापीठातील संशोधकांच्या सहकार्याने ही टाईमलाईन बनवली आहे. 

या टाईमलाईन नुसार 999,999,996 वर्षानंतर पृथ्वीवर सजीवांचे जगणं मुश्लिक होणार आणि 1,000,002,021 वर्षानंतर पृथ्वीचे अस्तित्व मिटणार. सूर्य हा पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरेल. वाढत्या औष्णिक ऊर्जेमुळे आपल्या स्वतःच्या ग्रहांसह सौर मंडळाच्या सर्व आतील ग्रहांना वेढले जाईल. शास्त्रज्ञांनी मांडलेली गणिते पाहिले असता पृथ्वीवरील जीवन पुढील 1 अब्ज वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. अशा स्थिती निर्माण होईल जी जीवनासाठी अनुकूल नसेल.

सूर्याचा विस्तार होत असताना, पृथ्वीवरील तापमान वेगाने वाढेल, ज्यामुळे हवेची गुणवत्ता खालावेल, असा इशाराही सुपरकॉम्प्युटरने सूचित केले आहे. 2018 मध्ये  प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनीही त्यांच्या मृत्यूच्या दोन आठवड्यांपूर्वीअशीच एक भविष्यवाणी केली होती. नवीन इशाऱ्यात शास्त्रज्ञांनीही असाच इशारा दिला आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ही आपत्तीजनक परिस्थिती टाळता येऊ शकते असे तज्ञांचे मत आहे.  मानव वस्ती निर्माम करण्यासाठी पर्याय शोधावे लागतील. यासाठी परग्रहावर कृत्रिम वातावरण तयार करुन  मानवी जीवन शक्य आहे. सूर्याच्या वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनल मास इजेक्शन आणि सौर वादळे निर्माण होत आहेत. याचा मोठा फटका बसत आहे. सौर वादळांमुळे वातावरणात बदल होत आहेत, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचा वेग मागील अंदाजांपेक्षा खूपच वेगवान आहे.

SOURCE : ZEE NEWS