Source :- ZEE NEWS
World Religion Population: जगभरातील विविध देशांमध्ये विविध धर्माचे लोक राहतात. मुस्लिम धर्म हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. तर, धर्म हिंदू तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या आणि चौथ्या धर्माचे नाव जाणून चकित व्हाल. जाणून घेऊया जगातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या धर्माच्या लोकांची आहे.
जगातील अनेक देशांमध्ये मुस्लिम धर्माचे पालन करणारे लोक सर्वाधिक आहेत. जगात मुस्लिम धर्म दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुस्लिम समुदायाची आकडेवारी 25.8 टक्के इतकी आहे. हिंदू धर्म तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगात हिंदूंची संख्या 15.1 टक्के इतकी आहे. ख्रिश्चन धर्महा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. जगात ख्रिश्चन धर्माचे पालन करणारे लोक सर्वात जास्त आहेत. ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या 31.6 टक्के इकी आहे आहे. ख्रिश्चन धर्म जगातील पहिल्या धर्माचा धर्म आहे.
चौथ्या क्रमांकाच्या ‘धर्मा’ बद्दल जाणून तुम्ही शॉक व्हाल. चौथा धर्म हा unaffiliated असा आहे. unaffiliated म्हणजे अशा लोकांचा समूह आहे जो कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. जगात यांची संख्या 14.4 टक्के आहे. या धर्माबद्दल फार कमी लोकांना महित आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक समुदायांची यादी तयार केली तर संलग्न नसलेले लोक चौथ्या क्रमांकावर येतील. पाचव्या स्थानावर बौद्ध धर्म आहे. या धर्माची संख्या 6.6 टक्के आहे. त्याहूनही खाली यहूदी आहेत. यांची संख्या 0.2 टक्के आहे.
ही यादी धर्माच्या आधारावर जागतिक लोकसंख्येच्या सन 2022 आधारावर तयार करण्यात आली आहे. ही माहिती चर्चेत आली आहे ती प्यू रिसर्च सेंटरने एका सर्वेक्षणामुळे. या सर्वेक्षणात जगात मोठ्या संख्येने कोणत्या धर्माचे लोक आपला धर्म सोडत आहेत. याबाबत देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगात ख्रिश्चन धर्म सोडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
स्पेन, स्वीडन, नेदरलँड्स, जर्मनी, कॅनडा, युके, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतून मोठ्या संख्येने लोकांनी ख्रिश्चन धर्म सोडला. स्पेनमध्ये ख्रिश्चनांची संख्या 54 टक्क्यांनी कमी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे इटलीमध्येही 20 टक्के लोकांनी ख्रिश्चन धर्म सोडला आहे. त्याचप्रमाणे, जगभरात बौद्ध धर्माचे अनुयायी देखील आपला धर्म सोडत आहेत. प्यू रिसर्चचा अहवाल धक्कादायक आहे.
SOURCE : ZEE NEWS