Source :- ZEE NEWS

Donald Trump on India Pakistan War : भारत – पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ला करण्यात येत आहे. उत्तरेकडील बारामुल्ला ते दक्षिणेकडील भूजपर्यंत, आंतरराष्ट्रीय सीमा आणि पाकिस्तानशी असलेल्या नियंत्रण रेषेवर 26  ठिकाणी ड्रोन दिसले आहेत. यामध्ये नागरी आणि लष्करी लक्ष्यांना संभाव्य धोका निर्माण करणारे संशयित सशस्त्र ड्रोन समाविष्ट आहेत. या ठिकाणी बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगड जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज, कुआरबेट आणि लाखी नाला यांचा समावेश आहे, असं संरक्षण सूत्रांनी सांगितलं आहे. 

भारत आणि पाकिस्तानने अनेक भारतीय शहरांवर ड्रोन हल्ले केल्याने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, व्हाईट हाऊसने शुक्रवारी म्हटलं आहे की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भारतीय उपखंडातील दोन्ही देशांमधील तणाव लवकरात लवकर कमी करायचा आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो दोन्ही देशांच्या संपर्कात आहेत. (America big statement amid India Pakistan War White House says President Donald Trump says)

भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांबद्दल, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लिविट म्हणाल्या, “ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री आणि आता आमचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो यांचाही सहभाग आहे. राष्ट्रपतींनी व्यक्त केले आहे की, त्यांना हे शक्य तितक्या लवकर तणाव कमी करायचे आहे. त्यांना समजते की हे दोन्ही देश दशकांपासून एकमेकांशी मतभेदात आहेत, अध्यक्ष ट्रम्प ओव्हल ऑफिसमध्ये येण्यापूर्वीपासून. पण, त्यांचे दोन्ही देशांच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे दोन्ही देशांच्या नेत्यांशी सतत संपर्कात आहेत आणि हा संघर्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.”

SOURCE : ZEE NEWS