Source :- ZEE NEWS

Operation Sindoor List Of Terrorists Killed: भारताने 6 आणि 7 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणांवरील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताने या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं असून या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तैयबा,  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांमधील अनेक धोकादायक दहशतवाद्यांचा समावेश आहे. याच ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या नावासंदर्भात मोठा खुलासा समोर आला आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार मयत दहशतवाद्यांचा भारताविरोधातील अनेक कारवायांमध्ये सहभाग होता. 

7 मे रोजी पाकिस्तानमध्ये झालेल्या भारतीय हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांचा तपशील खालीलप्रमाणे:

1) मुदस्सर खादियान खास उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल

संघटना: लष्कर-ए-तैयबा
> मरकझ तैयबा, मुरीदकेचा प्रभारी होता.
> पाकिस्तानी लष्कराने त्यांच्या अंत्यसंस्कारात गार्ड ऑफ ऑनर दिला.
> पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि पंजाबच्या मुख्यमंत्री (मरियम नवाज) यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.
> जमात-उद-दावाच्या हाफिज अब्दुल रौफ (जागतिक दहशतवादी म्हणून घोषित दहशतवादी) यांच्या नेतृत्वाखाली सरकारी शाळेत त्यांचा दफनविधी पार पडला.
> पाकिस्तानी लष्कराचे एक सेवेत असलेले लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे इस्पेक्टर जनरल मुदस्सर खादियान खासच्या प्रार्थना समारंभाला उपस्थित होते.

2) हाफिज मुहम्मद जमील

संघटना: जैश-ए-मोहम्मद
> हाफिज मुहम्मद जमील मौलाना मसूद अझहरचा ज्येष्ठ मेहुणा होता.
> बहावलपूरमधील मरकझ सुभानअल्लाहचा प्रभारी म्हणून तो कार्यरत होता.
> तरुणांना कट्टरपंथी शिकवण आणि जैश-ए-मोहम्मदसाठी निधी संकलनात सक्रिय सहभाग होता.

3) मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्तादजी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब

संघटना: जैश-ए-मोहम्मद
> मौलाना मसूद अझहरचा मेहुणा होता.
> जैश-ए-मोहम्मदसाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतले होते.
> जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता.
> आयसी-814 अपहरण प्रकरणात वॉन्टेड दहशतवादी होता.

4) खालिद उर्फ अबू आकाश

संघटना: लष्कर-ए-तोयबा
> जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता.
> अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यातही त्याचा सहभाग होता.
> फैसलाबादमध्ये अबू आकाशवर अंत्यसंस्कार पार पडले, ज्यात वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते.

5) मोहम्मद हसन खान

संघटना: जैश-ए-मोहम्मद
> मोहम्मद हसन खान हा पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरीचा मुलगा होता.
> जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचे समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका मोहम्मद हसन खानकडे होती.

SOURCE : ZEE NEWS