Source :- ZEE NEWS
Baloch Maratha: पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांना पराभव स्विकारावा लागला होता. पानिपतच्या युद्धाला 250 पेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाली आहे. मात्र अजूनही युद्धाच्या खुणा ताज्या आहेत. पानिपतच्या युद्धात पराभव पत्करावा लागल्याने मराठा सम्राज्याच्या उतरती कळा लागली. लाखो सैनिक मारले गेले, तर कित्येक जण बेपत्ता झाले. युद्धानंतर काही मराठे पानिपतमध्येच स्थायिक झाले. तर, सुमारे 25 हजार मराठी सैनिकांना बंदी बनवून अफगाणिस्तानला नेण्याचा विचार अब्दालीने केला होता. मात्र पानिपतच्या युद्धात अनेक बलुची शासकाचे सैनिक अब्दालीच्या बाजूने लढले होते.त्यामुळं अब्दालीने मोबदला म्हणून सारे मराठा युद्धकैदी बलुचिस्तानच्या शासकाला भेट स्वरुपात दिले होते. जे शेवटपर्यंत तिथेच पाहिले. मात्र आजही हे बलुच मराठे म्हणून ओळखले जातात. 300 वर्षांनंतरही त्यांना आपल्या मायभूमीची आस लागली आहे.
अब्दालीने युद्धकैद्यांना बलुचिस्तानात सोडल्यानंतर बलुचिस्तानचा शासक मीरा नासीर खान नुरीने या सर्व मराठा युद्ध कैद्यांची वर्गवारी केली. त्याने सैनिकांना वेगवेगळ्या जातीत विभागाले. त्यात बुगती, मर्री, गुरचानी,मझारी, रायसानी या काबिल्यांचा समावेश होता. या बलुची जमातींमध्ये आजही मराठा उपजात ही कायम आहे. बलुचिस्तानमध्ये आल्यानंतर तेथील मराठ्यांना आता हाच आपला प्रांत म्हणून नव्याने आयुष्याला सुरुवात केली. पण या परक्या मातीतही ते आपल्या संस्कृतीशी एकनिष्ठ राहिले. आजही बलुच मराठ्यांमध्ये महाराष्ट्रीयन संस्कृती पाहायला मिळते. त्यांच्या लग्नांमध्ये मराठी प्रथा दिसून येतात.
बलुचिस्तानमध्ये स्थायिक झालेल्या मराठ्यांपैकी काहींनी शेती करण्यास सुरुवात केली. तर काहीं सैन्यात सहभागी झाले.बुगटी मराठामध्ये अनेक उपशाखा असून त्यांच्या दरुरग मराठा आणि साऊ (शाहू) मराठा यांचा दर्जा सर्वात मोठा मानला जातो. म्हणजेच इथे ही मराठी संस्कृती दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील शाहु छत्रपती यांच्या नावावरुनच या जमातीला नाव देण्यात आलं. इतकंच नव्हे तर, पेशव्यांसोबत साधर्म्य आढळणारे पेशवानी नावही बलुची मराठ्यांमध्ये आढळते. बलुचींची भाषा मराठीशी जवळ जाणारी आहे. शाहू मराठा जमातीमध्ये मराठमोळा असा आई हाच शब्द वापरला जातो.
बलोची बुगटी मराठ्यांना इस्लाम धर्म पत्करला असला तरी त्यांच्या लग्नात मराठी संस्कृती पाहायला मिळते. लग्नापूर्वी हळद लागणे, घाणा भरणे, माप ओलांडणे, लग्नात गाठ बांधणे या साऱ्या प्रथा बुगती मराठ्यांच्या लग्नात होतात. महाराष्ट्रापासून हजारो कोसावर दूर असणारे हे मराठे आजही आपली संस्कृती टिकवून आहेत.
SOURCE : ZEE NEWS