Source :- ZEE NEWS

Indian Delegation in Airplane: भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्षादरम्यान हवाई हल्ल्यांनी सर्वांना धडकी भरवली होती. पाककडून होणारा ड्रोन हल्ल्याचा अपयशी मारा आणि त्याला भारतीय लष्करानं दिलेलं सडेतोड प्रत्युत्तर ही चर्व चर्चा अद्यापही सुरू असतानाच आणखी एका हल्ल्यानं भारतीयांना धडकी भरवली. कारण, इथंही भारताली काही खासदार ज्या विमानात होते ते लँड होण्याआधीच ड्रोन हल्ले झाले आणि काही मिनिटांसाठी परिस्थिती प्रचंड तणावाची झाल्याचं पाहायला मिळालं. 

नेमकं असं काय घडलं? 

डीएमके नेता आणि लोकसभा सदस्य कनिमोळी यांच्या नेतृ्तावाखाली भारतातील काही खासदारांचं शिष्टमंडळ मॉस्केच्या दिशेनं रवाना झालं. मात्र मॉस्को विमानतळावर त्यांचं विमान लँड होण्याआधीच तिथं युक्रेनकडून ड्रोन हल्ले करण्यात आले आणि पुढची काही मिनिटं खासदारांचं हे विमान हवेतच घिरट्या घालत राहिलं. 

रशियाची राजधानी मॉस्को इथं गुरुवारी रात्री झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये काही वेळासाठी तेथील विमानतळं बंद करण्यात आले. ज्यामुळं भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाला नेणारं विमानही हवेतच घिरट्या घालत राहिलं. काही वेळानंतर हिरवा सिग्नल मिळाला आणि त्यानंतरच भारतीयांना नेणारं हे विमान मॉस्कोच्या धावपट्टीवर सुरक्षितरित्या लँड झालं. पुढे तिथं मॉस्कोतील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी या शिष्ठमंडळाचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. 

ही घटना अपेक्षित… 

उपलब्ध माहितीनुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हल्लीच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधताना जेव्हा एखाद्या दुसऱ्या राष्ट्राचं शिष्टमंडळ रशियात येतं तेव्हा युक्रेनकडून ड्रोन हल्ला केला जातो असं म्हटलं होतं.  भारतीय नेते रशियात गेले असता याचीच प्रचिती आली, मात्र युक्रेनकडून अद्यापही यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

SOURCE : ZEE NEWS