Source :- ZEE NEWS

Viral Video : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही व्हिडीओ मनोरंजनाचे असतात तर काही हैराण करणारे. सध्या कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती जलद गतीने व्हायरल होते. अशातच एका मुलीचा अजगरांसोबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लोकांना अजगर आणि सापाचे नाव जरी काढले तरी अंगावर काटा येतो. यामध्ये सर्वात जास्त सापाला घाबरणारे मोठ्या प्रमाणात लोक आहेत. 

दरम्यान, काही लोक अजगराचे नाव काढताच पळ काढतात. तर काही लोक हे याच प्राण्यांना त्यांच्या घरात देखील ठेवतात. जसे आपण श्वान आणि मांजरासोबत खेळत बसतो याप्रमाणे. या व्हिडीओमध्ये देखील एक लहान मुलगी अजगरांच्या सुटकेसमध्ये खेळताना दिसत आहे. तिला पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र, ती त्या अजगरांसोबत एखाद्या खेळण्याप्रमाणे वागते. 

एकाच बेडवर अजगरांसोबत एरियाना करते मस्ती

व्हिडीओमधील ही मुलगी 5 ते 6 वर्षांची असल्याचं म्हटलं जात आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती या अजगरांमध्ये न रडता न घाबरता त्यांच्यासोबत खेळत आहे. ती या अजगरांच्या सुटकेसमध्ये इतकी आनंदी दिसत आहे की, तिला अजगरांच्या सुटकेसमध्ये बंद केलं तरी ती घाबरणार नाही. पण सध्या तिच्या या व्हिडीओमुळे तिचे अजगरांसोबतचे वर्तन हे एखाद्या नवीन माणसाला धक्का देणारे ठरू शकते. 

या मुलीचे नाव एरियाना आहे. तिच्या घरात बॉल पायथॉन जातीचे अनेक अजगर आहेत. अजगरांसोबत खेळण्यापासून ते त्यांच्यासोबत  बेडवर झोपी जाण्यापर्यंत ही त्यांची मैत्री आहे. तिला या अजगरांसोबत राहायला आवडते. तिच्या बेडवर जसा कपड्यांचा ढीग असतो तसा अजगरांचा ढीग आहे. तिला या अजगरांसोबत कसलीही भीती वाटत नाही. ती या अजगरांसोबत प्रवास देखील करते. 

व्हिडीओवर नेटकऱ्यांनी उपस्थित केले सवाल

मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. त्यासोबत व्हिडीओवर अनेकांनी प्रश्न देखील विचारले आहेत. ज्यामध्ये ती अजगरांसोबत प्रवास कशी करते? असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी प्राण्यांना प्रेमाने आपले बनवता येते का? असा देखील प्रश्न विचारला आहे. 

SOURCE : ZEE NEWS