Home LATEST NEWS ताजी बातमी युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला, अनेक जण जखमी

युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला, अनेक जण जखमी

3
0

Source :- BBC INDIA NEWS

युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वांत मोठा

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 2 मिनिटे

युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच युक्रेनने मॉस्कोवर सर्वात मोठा हल्ला केला आहे. रशियाच्या राजधानीच्या परिसरात सुमारे 200 ड्रोननी हल्ला केला. या हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी आकाशात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले होते.

मॉस्को ओब्लास्टचे गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉस्को भागात 17 लोक जखमी झाले आहेत.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशभरात सुमारे 1 हजार ड्रोन आणि 4 युक्रेनियन क्रूझ क्षेपणास्त्रे पाडून नष्ट करण्यात आली. दक्षिणेकडील रोस्तोव्ह भागातील एका तेल डेपोवरही हल्ला झाला, ज्यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं की, कीवने पुन्हा एकदा मॉस्को भागात ‘लांब पल्ल्याच्या कारवाया’ (लाँग रेंज सँक्शन्स) केल्या आहेत. युक्रेनकडून रशियावर दूरवरून केलेल्या हल्ल्यांना सौम्य भाषेत सांगण्यासाठीचा हा शब्दप्रयोग आहे.

“हे युद्ध आता संपवण्याची वेळ आली आहे. रशियानेही शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक राजनैतिक पावलं उचलली पाहिजेत,” असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हा मोठा ड्रोन हल्ला गेल्या आठवड्यात कीव्हवर झालेल्या रशियन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आला आहे. त्या हल्ल्यामध्ये कीव्हमधील एका महत्त्वाच्या धार्मिक स्थळाला आग लागली होती. यात त्या धार्मिक स्थळाचे नुकसान झाले होते, असं त्यांनी म्हटलं.

झेलेन्स्की म्हणाले “आम्हाला हे युद्ध नकोय, कधीच नव्हतं पाहिजे, पण जर युक्रेन जळत असेल तर मॉस्कोही जळेल.”

रिफायनरी, शॉपिंग सेंटरला आग

मॉस्कोवर ड्रोन हल्ले

फोटो स्रोत, Getty Images

आग्नेय मॉस्कोमधील कापोत्न्या रिफायनरीवर एका महिन्यात तिसऱ्यांदा आणि या आठवड्यात दुसऱ्यांदा हल्ला झाल्यानंतर तेथे आग लागली. धुराच्या काळ्या लोटांनी आकाश झाकले गेले.

अनेक व्हीडिओमध्ये स्फोटाच्या तीव्रतेमुळे मोठ्या तेल साठवण टाकीचे झाकण अनेक मीटर उंच हवेत उडाल्याचे दिसत आहे.

जवळील एका शॉपिंग सेंटरलाही आग लागली. ड्रोनचे अवशेष इमारतीवर पडल्यामुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. तसेच अनेक उंच निवासी इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

मॉस्कोमधील चारही विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले. तसेच 500 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली किंवा उशिराने चालवण्यात आली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC