Source :- BBC INDIA NEWS

वाळू उपसा की विनाश? तळाशीलमध्ये समुद्र का घुसतोय?
Published
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळाशील हे समुद्र आणि नदीच्या मधोमध वसलेलं छोटं गाव. गावकऱ्यांचा आरोप आहे की, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वाळू उपशामुळे किनाऱ्याची धूप झाली, जमीन खचू लागली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि मासेमारीवरही त्याचा परिणाम झाला आहे.
या ग्राऊंड रिपोर्टमध्ये- बीबीसी मराठीने तळाशीलला भेट देऊन ग्रामस्थ, मच्छीमार, स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाची भूमिका जाणून घेतली.
गावकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? प्रशासन काय सांगतं? आणि या किनारी गावासमोर उभा असलेला प्रश्न नेमका किती गंभीर आहे?
रिपोर्ट- अल्पेश करकरे
शूट- शार्दुल कदम
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




