Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images/Reuters
अमेरिकेने शुक्रवारी (26 जून) इराणमधील काही ठिकाणांवर हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर शस्त्रसंधीचे ‘उल्लंघन’ केल्याचा आरोप केल्यानंतर हा हल्ला झाला.
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एका कार्गो शिपवर (मालवाहू जहाज) हल्ला झाल्याच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा आरोप केला होता.
खरं तर, गुरुवारी (25 जून) जहाजावर एका ड्रोनने हल्ला केला होता. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर, हजारो अडकलेल्या खलाशांना बाहेर काढण्यासाठी योजना आखण्यात आली.
यानंतर शुक्रवारी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) इराणच्या क्षेपणास्त्र-ड्रोन तळांवर आणि किनारपट्टीवरील रडार ठिकाणांवर हल्ला केल्याचे सांगितले.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे.
हल्ल्याची घोषणा करण्याच्या अगदी आधी अमेरिका इराणवर प्रत्युत्तर देईल का, असे ट्रम्प यांना विचारले असता, त्यांनी “तुम्ही बघालच,” असे उत्तर दिले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




