Home LATEST NEWS ताजी बातमी युद्धविरामावर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले; इराणने काय दिली प्रतिक्रिया?

युद्धविरामावर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले; इराणने काय दिली प्रतिक्रिया?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

अमेरिका-इराण यांच्यातील युद्धविराम संपुष्टात आला असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो शिखर परिषदेदरम्यान पत्रकार परिषदेत म्हटले.

प्रसारमाध्यमांनी इराणबरोबरच्या सामंजस्य कराराबाबत (एमओयू) विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, “हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या मते, हा विषय आता संपला आहे,” असं म्हटलं आहे.

“मला आता त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. ते खूप वाईट आणि विकृत विचारांचे लोक आहेत. त्यांचं नेतृत्वही अशाच लोकांकडे आहे.”

“ते अतिशय क्रूर आणि हिंसक आहेत. त्यांच्या हातात अण्वस्त्रं असती, तर ते वापरायलाही त्यांनी मागेपुढे पाहिलं नसतं. माझ्या मते, हा विषय आता संपला आहे,” असं वक्तव्य त्यांनी केलं.

ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.

…अन् कच्च्या तेलाच्या किंमतीत 5 टक्क्यांची वाढ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याचं वक्तव्य केल्यानंतर, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 5 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

इराणसोबतच्या युद्धविरामाबाबत ट्रम्प म्हणाले, “माझ्या मते सर्वकाही आता संपलं आहे. मला आता त्यांच्याशी कोणत्याही प्रकारही चर्चा करायची नाही. ते अतिशय वाईट लोक आहेत.”

ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीमध्ये 3.5 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत 78.09 डॉलरपर्यंत पोहोचली.

होर्मुझची सामुद्रधुनी

फोटो स्रोत, maps4media via Getty Images

होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेल वाहून नेणाऱ्या टँकर्सवर हल्ले होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे तेलाच्या पुरवठ्यामध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, यापूर्वी अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या पातळीवर परतल्या होत्या.

युद्धविरामावरून इराणचे अमेरिकेवर गंभीर आरोप

ट्रम्प यांनी ‘युद्धविराम आता संपुष्टात आला आहे’ असं म्हटल्यानंतर इराणने त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या ठिकाणांहून इराणवर हल्ले झाले किंवा हल्ल्याची योजना आखली गेली आहे. त्या ठिकाणांवर इराणी सैन्य प्रत्युत्तरादाखल हल्ला करू शकते, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

त्याचबरोबर इराणने आखाती देशांना इशारा दिला आहे की, अमेरिकेला कोणतीही कारवाई करण्यासाठी आपल्या जमिनीचा किंवा सुविधांचा वापर करू देऊ नका. तसे केल्यास ते अमेरिकेला साथ देणं आणि त्या कारवाईत सहभागी होण्यासारखं मानलं जाईल, असंही इराणने म्हटलं आहे.

तेहरानमध्ये अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांचे छायाचित्र असलेले पोस्टर हातात धरलेला एक स्थानिक नागरिक. (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Kaveh Kazemi/Getty Images

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवदेनात म्हटलं आहे की, अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनाऱ्याजवळील अनेक देखरेख केंद्रांवर हल्ले केले आहेत. हे युद्ध थांबवण्याच्या कराराचं उल्लंघन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणच्या हक्कांचं उल्लंघन झालं आहे. तसेच, लेबनॉनवर इस्रायलचे हल्ले अजूनही सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं.

इराणचं म्हणणं आहे की, या कारणांमुळे युद्ध थांबवण्याच्या करारातील अनेक महत्त्वाच्या अटी निष्प्रभ ठरल्या आहेत. इराणने यासाठी अमेरिकाला जबाबदार धरले आहे.

‘ते खोटं बोलतात, त्यांच्याशी बोलणं म्हणजे वेळेचा अपव्यय’- ट्रम्प

नाटो शिखर परिषदेदरम्यान पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “मला आता त्यांच्याशी कोणतीही चर्चा करायची नाही. ते खूप वाईट लोक आहेत.”

ट्रम्प म्हणाले, “माझ्यासाठी तर हा विषय आता संपला आहे. त्यांच्याशी बोलणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. ते खोटं बोलतात.”

“दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी चर्चा करू शकतात, पण त्यात ते त्यांचा वेळ वाया घालवत आहेत,” असंही त्यांनी म्हटलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धविरामाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

ट्रम्प यांनी इराणच्या प्रतिनिधींवर टीका करत म्हटलं, “ते मानसिकदृष्ट्या आजारी आहेत. त्यांचे नेतेही तसेच आहेत. माझ्या मते, त्यांच्याशी व्यवहार करणं म्हणजे केवळ वेळ वाया घालवणं आहे.”

ट्रम्प पुढे म्हणाले की, ते “स्टीव्ह व्हिटकॉफ आणि जेरेड कुश्नर यांच्याशी चर्चा करतील.” पण त्यांनी हेही स्पष्ट केलं की, “पुन्हा चर्चेला बसायचं की नाही, हे तेहरानवर अवलंबून आहे.”

दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, “सर्वांचं मत आहे की, इराणकडे अण्वस्त्रं असू नयेत. आम्ही एका करारापर्यंत पोहोचलोही होतो, पण नंतर ते प्रसारमाध्यमांसमोर असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की, अशी कोणतीही चर्चा झालीच नव्हती.”

इराण आणि अमेरिका यांच्यात प्रत्युत्तरादाखल झालेल्या हल्ल्यांनंतर ट्रम्प यांचं हे वक्तव्य समोर आले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर भारतीय शेअर बाजारात घसरण

बुधवारी (8 जुलै) बाजार बंद होण्याच्या शेवटच्या तासांत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 2 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली.

बुधवारी बाजार बंद होण्याच्या शेवटच्या तासांत बीएसई सेन्सेक्स 1,677.12 अंकांनी म्हणजेच 2.15 टक्क्यांनी घसरून 76,503.60 अंकांवर बंद झाला.

तर एनएसई निफ्टी 516.65 अंकांनी म्हणजेच 2.12 टक्क्यांनी घसरून 23,882.05 अंकांवर बंद झाला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याचे जाहीर केल्यानंतर त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.

फोटो स्रोत, Punit PARANJPE / AFP via Getty Images

गुंतवणूकदारांना भीती आहे की, अमेरिका-इराणमधील तणाव वाढल्यास जगाची अर्थव्यवस्था आणि तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री झाली.

या घडामोडींचा आशियाई शेअर बाजारांवर संमिश्र परिणाम दिसून आला.

दुसरीकडे, नाटो शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याचा थेट परिणाम युरोपमधील शेअर बाजारावर झाला आहे.

युरोपमधील प्रमुख स्टॉक्स 600 निर्देशांक 1.6 टक्क्यांनी घसरून 636.08 अंकांवर आला. हा गेल्या आठवड्यातील त्याची सर्वात नीचांकी स्तर आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC