Home LATEST NEWS ताजी बातमी सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, नेमकं प्रकरण काय?

सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, नेमकं प्रकरण काय?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

सुखबीर सिंग बादल

फोटो स्रोत, ANI

Published

वाचन वेळ: 1 मिनिटे

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करण्यात आलाय.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, सुखबीर सिंग बादल यांच्या हाताला दुखापत झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सुखबीर सिंग बादल हे पंजाबमधून आपल्या कुटुंबीयांसोबत नांदेडमधील श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे दर्शनाला आले होते. त्यावेळी सकाळी 11 च्या सुमारास हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे.

सुखबीर सिंग बादल यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांच्यावरही हल्ला करण्यात आला असून ते जखमी झाले आहेत, अशीही माहिती समोर येत आहे.

हा हल्ला कुणी केला आणि त्यामागचे कारण काय, याचा तपास नांदेड पोलीस करत आहेत.

ही बातमी सातत्यानं अपडेट होत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC