Home LATEST NEWS ताजी बातमी पूर, बेपत्ता नागरिक आणि मदतकार्य; पाहा नेपाळमधील भीषण पुराची छायाचित्रं

पूर, बेपत्ता नागरिक आणि मदतकार्य; पाहा नेपाळमधील भीषण पुराची छायाचित्रं

4
0

Source :- BBC INDIA NEWS

नेपाळच्या उत्तरेकडील रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीत आलेल्या पुरानंतर विविध जिल्ह्यांमध्ये 18 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.

फोटो स्रोत, Reuters

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

नेपाळच्या उत्तरेकडील रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला आलेल्या पुराने मोठं नुकसान केलं आहे. या आपत्तीत 95 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो पर्यटक आणि सुरक्षा दलातील कर्मचारी बेपत्ता आहेत. मदत आणि मदतकार्य सुरू असतानाच या संकटाचं भीषण रुप छायाचित्रांमधून स्पष्टपणे दिसून येतं.

पुरामुळे त्रिशूली नदीकाठचा परिसर चितवनपर्यंत धोक्यात येऊ शकतो, असं नेपाळ सरकारने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

291 परदेशी नागरिकांसह 384 पर्यटकांशी संपर्क होऊ शकलेला नाही, असं नेपाळ पर्यटन मंडळाने सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

या आपत्तीत आतापर्यंत एकूण किती जण जखमी झाले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

फोटो स्रोत, Reuters

नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी देशाच्या प्रतिनिधी सभेला संबोधित केलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं आहे की, रसुवा येथील आपत्तीजन्य परिस्थिती भूकंपासह झालेल्या हिमस्खलनामुळे निर्माण झाली होती आणि याबाबत पुढील पडताळणी केली जात आहे.

फोटो स्रोत, Reuters

पूरानंतर नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

परराष्ट्र मंत्री खनाल यांनी सांगितलं की, 26 पोलीस अधिकारी, 9 सशस्त्र पोलीस दलाचे जवान, 44 नेपाळी लष्कराचे जवान, सीमाशुल्क आणि स्थलांतर विभागातील कर्मचारी तसेच काही स्थानिक रहिवाशांशी संपर्क होऊ शकलेला नाही.

फोटो स्रोत, Reuters

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती देताना लिहिलं,

फोटो स्रोत, Reuters

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC