Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, X
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे
नेपाळमधील भीषण पुराची आता भयावह दृश्यं आणि व्हीडिओ समोर येत आहेत.
सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटो आणि व्हीडिओंवरून नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या पुराचा लोकांवर किती भीषण परिणाम झाला आहे, हे दिसून येतंय.
या व्हीडिओंमध्ये पुराचं पाणी आणि मातीचा ढिगारा एकापाठोपाठ एक परिसर उद्ध्वस्त करताना दिसत आहे. पक्की घरंदेखील पुराचं पाणी एखाद्या काडीसारखी वाहून नेत असल्याचं दिसत आहे.
मात्र, या भयावह व्हीडिओंमध्ये एक व्हीडिओ मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतंय.
त्रिशूली नदीलगतच्या परिसरातील व्हीडिओ – बीबीसी व्हेरिफाय
बीबीसी व्हेरिफायच्या माहितीनुसार, हा व्हीडिओ त्रिशूली नदीलगतच्या परिसरातील आहे.
बीबीसी व्हेरिफायने या घराचा व्हीडिओ शेअर करताना लिहिलंय की, त्यावेळी काही लोक या घरात अडकले होते.
बीबीसी व्हेरिफायने या लोकांची ओळख जाहीर केलेली नाही. मात्र, व्हीडिओ शेअर करताना त्यांनी सांगितलं आहे की, या काळात हे कुटुंब कसंबसं बचावलं. दरम्यान, घराच्या छतावरून कोणीतरी मदतीसाठी लाल रंगाचा दुपट्टा फडकवत होतं.
पूर ओसरल्यानंतर लोक मदतीसाठी तिथे पोहोचले.
शॉर्ट व्हीडिओ पाहा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हीडिओमध्ये किमान तीन लोक दिसत आहेत. त्यात एक पुरुष, एक महिला आणि एक मूल, जे बहुधा लहान मुलगी आहे.
हे लोक घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीसारख्या जागेत अडकलेले दिसत आहेत. त्यांच्या चारही बाजूंनी चिखलाचा महापूर वाहत आहे. त्यासोबत मोठमोठे दगड, चिखलाचा ढिगारा आणि घराच्या छताचे पत्रेही वाहून येत आहेत.
या वस्तू सातत्याने त्या घरावर आदळत आहेत. तरीही घर उभं आहे.
दरम्यान, घरातील लोक असहायपणे बाल्कनीत उभे असल्याचं दिसत आहे. एक महिला घराच्या छतावर जाऊन मदतीसाठी लाल दुपट्टा फडकवत असल्याचं दिसत आहे.
सोशल मीडियावर लोक या व्हीडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर लोक काय म्हणत आहेत?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक एरिक चेन यांनी या व्हीडिओचं फुटेज शेअर करताना लिहिलंय की, “अलीकडे पाहिलेल्या सर्वात अस्वस्थ करणाऱ्या दृश्यांपैकी हे एक आहे. आजूबाजूचं सगळं उद्ध्वस्त करणाऱ्या वेगवान प्रवाहाच्या मध्यभागी एक घर अजूनही उभं आहे.”
“लोक बाल्कनी आणि छतावर कसंबसं तग धरून आहेत, तर चिखल, बर्फ, खडक आणि पाण्याची मोठी लाट नेपाळ-तिबेटच्या या दरीला चिरत पुढे जात आहे. हे केवळ आकडे नाहीत. हे एक कुटुंब आहे, जे पाण्याची पुढची लाट त्यांच्याकडे उरलेली शेवटची सुरक्षित जागाही वाहून नेणार आहे की नाही, याची वाट पाहत आहे. ते जिवंत राहावेत, अशी प्रार्थना आहे. पाण्याची आणखी एक लाट येण्यापूर्वी बचाव पथक त्यांच्यापर्यंत पोहोचावं, अशी प्रार्थना आहे.”
फोटो स्रोत, BBC/INSTAGRAM
“या फुटेजला असह्य बनवणारी गोष्ट केवळ निसर्गाची ताकद नाही. नेपाळच्या बाजूने आलेल्या वृत्तांनुसार, पुराचा हा वेगवान प्रवाह तिबेटच्या बाजूने ल्हेन्दे-भोटेकोशी नदीपासून सुरू झाला, जिथे हिमनदीचा काही भाग तुटल्यानंतर मलबा नदीत जाऊन पडला. खालच्या भागात राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, त्यांना चिनी अधिकाऱ्यांकडून वेळेवर कोणतीही अधिकृत पूर्वसूचना मिळाली नाही.
बीजिंगकडून सूचना येण्याआधीच स्थानिक लोकांनी धोक्याची माहिती दिली. त्रिशूली नदीची पाणीपातळी जवळपास 30 मिनिटांत 9 मीटरपर्यंत वाढली. सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी मिळालेल्या वेळेचा आणि बाल्कनीत अडकून जग आपल्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहण्याचा हा अर्धा तासच फरक आहे.”
“चीनने नंतर वेळेवर इशारा देण्यात कोणतीही कुचराई झाल्याच्या वृत्ताला नाकारत म्हटलं की, बर्फ आणि खडकांचा हा हिमस्खलन इतका अचानक झाला की नदीतील गेजलाही तो फारसा टिपता आला नाही. मग 2025 मध्ये याच नदीत आलेल्या पुरानंतर ज्या सीमापार पूर्वसूचना यंत्रणेवर चर्चा झाली होती, ती यावेळी पूर येईपर्यंत कराराच्या स्वरूपात लागू का होऊ शकली नाही, याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. वरच्या भागातून येणारी शांतता ही केवळ तांत्रिक बाब नाही. ज्यांच्याकडे वाचण्यासाठी कुठेही जाण्याची वेळ नव्हती, त्यांच्याकडून हिरावून घेतलेली ही काही मिनिटं आहेत.”
“शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. एक हजाराहून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. त्यात परदेशी यात्रेकरू आणि ट्रेकर्सचाही समावेश आहे. घर कोसळण्यापासून वाचलं, ही काही चमत्काराची कहाणी नाही. हे जीवन आणि नदीच्या दरम्यान उरलेलं अत्यंत नाजूक शेवटचं अंतर आहे. हे कुटुंब अजूनही त्याच ठिकाणी सुरक्षित असावं, अशी प्रार्थना आहे.”
फोटो स्रोत, Getty Images
नेपाळच्या पुरात मृतांचा आकडा 600 पार
नेपाळच्या पुरात आतापर्यंत 734 मृतदेह सापडले असून सुमारे 2,500 लोक बेपत्ता आहेत. या आपत्तीमधून आतापर्यंत जवळपास 4,500 लोकांना वाचवण्यात आलं आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 404 नागरिक सुरक्षित असून 338 नागरिकांशी संपर्क झाला आहे.
नेपाळमध्ये पुरानंतर आंतरराष्ट्रीय मदत संस्थांनी आणि अनेक देशांच्या सरकारांनी आपत्कालीन मदत आणि बचावकार्याला वेग दिला आहे.
युरोपीय संघ, कॅनडा आणि अमेरिका यांच्यासह अनेक देशांनी नेपाळला मदत सामग्री किंवा आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
अधिक शोधा
शॉर्ट व्हीडिओ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
-

व्हीडिओ, मुंबईत गणेशमूर्ती कोसळली; दोघांचा मृत्यू आणि 5 जण जखमी, वेळ 0,30
-

व्हीडिओ, दुष्काळामुळे युरोपमध्ये ऊर्जेचा तुटवडा, कालवा फोडून सोडलं नदीत पाणी, वेळ 0,56
-

व्हीडिओ, साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार, भंडाऱ्यात नागरिकांचा संताप, वेळ 1,23
-

व्हीडिओ, ‘गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची’ या सीरिजच्या पहिल्या भागात बोलूयात ‘लग्न’ या विषयाबद्दल., वेळ 1,19
-

व्हीडिओ, बसस्थानकावर महिलेला हार्ट अटॅक, महिला कंडक्टरने CPR देत वाचवला जीव, वेळ 0,55
-

व्हीडिओ, ‘शिव्या दिल्यावर केस होणार असेल, तर सर्वाधिक केसेस भाजप आयटी सेलवर व्हायला हव्या’; अभिजीत दिपकेंची टीका, वेळ 1,19
-

व्हीडिओ, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंनी म्हटलं,’वुई हॅव्ह डन इट’, वेळ 0,51
-

व्हीडिओ, ‘मी अजून जिवंत आहे’, हॉस्पिटलमधून सोनम वांगचूक यांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी, वेळ 1,58
-

व्हीडिओ, जंतर-मंतरवर जेवणाच्या ऑर्डर कुठून आणि कशा येतायत?, वेळ 2,41
-

व्हीडिओ, ‘…म्हणून मुलींचे कपडे फाडणार का तुम्ही?’ अखिलेश यादव भडकले, वेळ 1,55
-

व्हीडिओ, ‘ही लोकशाही नाहीये’, काळे कपडे घालून सरकारचा निषेध, प्रियंका गांधी म्हणतात…, वेळ 1,21
-

व्हीडिओ, मनोज जरांगे जंतर मंतरवर पोहोचले, मंचावर अभिजीत दिपकेंची भेट घेतली, वेळ 0,41
-

व्हीडिओ, दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखलं; महादेव जानकर, राजू शेट्टीही ताब्यात, वेळ 0,55
-

व्हीडिओ, स्पेनने वर्ल्ड कप जिंकला आणि कोल्हापुरात ‘असा’ जल्लोष झाला, वेळ 0,49
शॉर्ट व्हीडिओचा शेवट
SOURCE : BBC


















