Home LATEST NEWS ताजी बातमी कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबईत बांधलेली मेट्रो लाईन पाडावी लागणार का?

कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबईत बांधलेली मेट्रो लाईन पाडावी लागणार का?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबईत बांधलेली मेट्रो लाईन पाडावी लागणार का?

Published

हा जो पूल दिसतोय ना, त्यावरून मुंबई मेट्रोची एक मार्गिका जाते. ती उभारण्यासाठी 250 कोटी रुपये लागलेयत, पण हा पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. कारण मुळात या मार्गाचा आराखडा आखताना उंचीच्या मर्यादा पाळलेल्या नाहीत, असं समोर आलं आहे.

प्रशासनानं त्यावर स्पष्टीकरण दिलंय. नेमकं काय झालंय, जाणून घेऊयात.

तर मुंबईच्या मेट्रो सात प्रकल्पातला गुंदवली ते एयरपोर्टपर्यंत असा 3.42 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि त्यातलं हे न्यू एयरपोर्ट कॉलनी रेल्वे स्टेशन, ज्याचं बांधकाम आता सध्या थांबवलेलं दिसतंय.

हा सगळा परिसर विमानतळापासून जवळ आहे आणि त्यामुळे इथे इमारतींच्या उंचीवर बंधनं आहेत. उंच बांधकाम करताना एयरपोर्ट अथॉरिटीची म्हणजे विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. तशी परवानगी मेट्रोनं घेतली, पण ती घेताना वरच्या ओव्हरहेड वायरच्या उंचीचा विचारच झाला नसल्याचं समोर आलं आहे.

MMRDA नं जाहीर केलेल्या निवेदनात मेट्रो प्रकल्पाचे संचालक बसवराज एम. बी म्हणतात, “या प्रकल्पासाठी SYSTRA-CEG-SMCIPL यांची जनरल कन्सल्टंट/इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाचे डिझाइन तसेच विमानतळ परिसरातील उंचीच्या मर्यादांसह आवश्यक सर्व परवानग्यांचा समन्वय करण्याची जबाबदारी सल्लागाराची होती.

मात्र, OHE यंत्रणेसाठी लागणाऱ्या अतिरिक्त उंचीची आवश्यकता डिझाइन आणि नियोजनाच्या योग्य टप्प्यावर सल्लागाराकडून पुरेशा प्रमाणात विचारात घेण्यात आली नाही.

या अतिरिक्त उंचीच्या मंजुरीसाठी एमएमआरडीएकडून सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे (AAI) पाठपुरावा सुरू आहे. किती उंचीची परवानगी देता येईल आणि त्यानुसार प्रकल्पात काही बदल करावे लागतील का, याबाबत AAI च्या अंतिम तांत्रिक अहवालाची/पुष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.

AAI चा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर एमएमआरडीए त्याचे सविस्तर तांत्रिक मूल्यमापन करून पुढील योग्य निर्णय घेईल.

निर्धारीत मर्यादेचं साधारण अडीच मीटर म्हणजे 8 फुटांनी उल्लंघन झालं आहे. हा आकडा छोटा वाटू शकतो, पण विमानांच्या अचूक लँडिंग आणि टेक ऑफसाठी थोडंसं अंतरही निर्णायक ठरू शकतं. त्यामुळे एयरपोर्ट अथॉरिटीनं जर उंची सुरक्षित नसल्याचा निर्वाळा दिला, तर इथलं बांधकाम पाडून नव्यानं उभारण्याची नामुष्की ओढवू शकते.

त्यामुळे डिझाईनमधल्या एका छोट्या चुकीचा भुर्दंड लोकांना सहन करावा लागणार, अशी टीका होते आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC