Home LATEST NEWS ताजी बातमी समज-गैरसमज : महात्मा गांधी यांच्याबद्दल GenZ तरुणांना काय प्रश्न पडतात? तुषार गांधींसोबत...

समज-गैरसमज : महात्मा गांधी यांच्याबद्दल GenZ तरुणांना काय प्रश्न पडतात? तुषार गांधींसोबत चर्चा

5
0

Source :- BBC INDIA NEWS

समज-गैरसमज : महात्मा गांधी यांच्याबद्दल GenZ तरुणांना काय प्रश्न पडतात? तुषार गांधींसोबत चर्चा

Published

महात्मा गांधी नेमकं काय रसायन होतं? गांधींच्या रामराज्याच्या कल्पनेमुळे हिंदू-मुस्लीम द्वेषाला खतपाणी मिळालं? गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील मतभेद नेमके कशावर होते? पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याचा मुद्दा काय होता? आणि गांधीजी भगतसिंगांना वाचवण्यासाठी अधिक काही करू शकले असते का?

‘समज-गैरसमज’च्या या विशेष भागात तुषार गांधी यांच्यासोबत महात्मा गांधींच्या विचारांपासून त्यांच्या निर्णयांपर्यंत आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादग्रस्त पैलूंपर्यंत अनेक प्रश्नांवर दिलखुलास चर्चा झाली.

या भागात काय पाहाल?

• गांधीजींची रामराज्याची संकल्पना आणि हिंदू-मुस्लीम संबंध

• स्वतंत्र दलित मतदारसंघाचा प्रश्न आणि डॉ. आंबेडकरांसोबतचे मतभेद

• भारताची फाळणी, गांधींची भूमिका आणि पाकिस्तानला देण्यात आलेले 55 कोटी रुपये

• फाळणीच्या काळात गांधी धार्मिक आणि सामाजिक वास्तव समजून घेण्यात कमी पडले का?

• गांधींचे ब्रह्मचर्याचे प्रयोग आणि त्यावर झालेली तत्कालीन मतमतांतरे

• ‘मजबूरी का नाम गांधी’ या म्हणीमागची कथा

• गांधींवर हिंदू महासभेकडून करण्यात आलेले आरोप

• गांधी आणि सावरकर यांच्यातील वैचारिक मतभेद

• भगतसिंगांना वाचवण्यासाठी गांधींनी काय प्रयत्न केले?

• ‘खेड्यांकडे चला’ आणि ग्रामस्वराज्याची गांधींची कल्पना

• गांधींच्या ग्रामस्वराज्याच्या कल्पनेसमोर आजच्या ग्रामीण भारताची परिस्थिती

• गांधी आणि आंबेडकर यांच्या ग्रामीण भारताबाबतच्या वेगळ्या भूमिका

• सत्याग्रह आणि सामान्य माणूस

• गांधींचं साधं राहणीमान आणि संपत्तीबद्दलचा दृष्टिकोन

• गांधीजींच्या आयुष्यातील अशा कोणत्या चुका होत्या, ज्या टाळता आल्या असत्या?

• गांधींच्या विचारांवर आजही प्रश्न उपस्थित का होतात?

• अहिंसा, आंदोलन आणि आजच्या सामाजिक चळवळी

गांधीजींचं आयुष्य अनेक विरोधाभास, प्रयोग, निर्णय आणि आत्मपरीक्षणांनी भरलेलं होतं. म्हणूनच त्यांच्या विचारांकडे केवळ गौरव किंवा टीकेच्या चौकटीतून न पाहता, प्रश्न विचारून आणि ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्याचा हा प्रयत्न.

‘समज-गैरसमज’ तरुणांच्या सडेतोड प्रश्नांचं व्यासपीठ.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूचे प्रकाशन

SOURCE : BBC