Source :- BBC INDIA NEWS

मुंबईत आंदोलन करणाऱ्या आदिवासी मुलांची धरपकड
Published
राज्यभरातील आदिवासी मुले आपल्या विविध मागण्यांसाठी लाँग मार्च करत मुंबईच्या दिशेने आली होती.
या मुलांना आझाद मैदान येथे आंदोलन करायचे होते; परंतु त्यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नव्हती.
मुंबईतील काँग्रेस प्रदेश कार्यालय टिळक भवन परिसरात आंदोलक मुलं उपस्थित होती. तिथून पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे व्हीडिओत दिसत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




