Home LATEST NEWS ताजी बातमी जेलर 2 : ‘रजनीकांत’ नावाचा ब्रँड 50 वर्षांनंतरही कायम राहण्याची गोष्ट

जेलर 2 : ‘रजनीकांत’ नावाचा ब्रँड 50 वर्षांनंतरही कायम राहण्याची गोष्ट

3
0

Source :- BBC INDIA NEWS

रजनीकांत

रजनीकांत यांना चित्रपटांमध्ये येऊन 50 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. असं असूनही वयाच्या 75 व्या वर्षीही ते पडद्यावर ‘सोलो हिरो’ म्हणून कायम आहेत.

त्यांचा ‘जेलर 2’ हा चित्रपट 15 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे. मोठ्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे.

रजनीकांत यांच्या आधीच्या ‘कुली’ या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. पण त्यांचा ‘जेलर 2’ कडून असलेल्या अपेक्षांवर काहीही विशेष परिणाम झालेला नाही.

आजही अनेक नवीन दिग्दर्शक मुलाखतींमध्ये म्हणतात, “माझ्याकडे सुपरस्टार रजनीकांत यांच्यासाठी एक कथा (स्क्रिप्ट) आहे.”

मात्र, या कथांमध्ये ते रजनीकांत यांना वडील किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या सहाय्यक भूमिकेत नाही, तर थेट हिरोच्या रूपातच पाहतात.

कोणाचाही चित्रपट असला, तरी त्या चित्रपटात रजनीकांत दिसतातच.

अनेक तरुण अभिनेते पडद्यावर स्वतःला ‘रजनीकांत यांचे चाहते’ असल्याचे सांगतात.

तसंच, इतर भाषांच्या अनेक चित्रपटांमध्ये जेव्हा तमिळनाडूचं दृश्य दाखवलं जातं, तेव्हा कोणत्या न कोणत्या फ्रेममध्ये रजनीकांत यांचं पोस्टर किंवा छायाचित्र पाहायला मिळतंच.

‘फोर्ब्स इंडिया’नं 2013 मध्ये रजनीकांत यांच्यावर प्रकाशित केलेल्या एका लेखात लिहिलं होतं, “चित्रपटांचं एक आयुष्य असतं, पण त्यांच्या स्टार्सचं नसतं. ते ब्रँड बनतात. रजनीकांत यांचे चाहते चित्रपट पाहायला जात नाहीत. ते पडद्यावर रजनीकांत यांना पाहण्यासाठी जातात.”

‘रजनी’ नावाचा ब्रँड

लेखिका जे दीपा म्हणतात, “रजनीकांत काही चित्रपटांचं खुल्या मनानं कौतुक करतात. अशा प्रकारच्या कथांमध्ये काम करण्याची त्यांची इच्छा असल्याचंही ते सांगतात.”

“पण ते अत्यंत काळजीपूर्वक केवळ त्याच चित्रपटांची निवड करतात, जे त्यांच्या चाहत्यांना आवडतील. याच कारणामुळे ‘रजनी’ नावाचा ब्रँड आजवर टिकून आहे.”

जे दीपा यांनी चित्रपटांवर ‘ओलि विथगर्गल’ आणि ‘कथै टू तिरैकथै’ यांसारखी अनेक पुस्तकं लिहिली आहेत.

त्या म्हणतात, “रजनी यांना आपल्या जमेच्या बाजू आणि कमतरता चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत. पडद्यावर या गोष्टी कशा प्रकारे दिसतील, याबद्दल ते नेहमी सतर्क असतात.”

रजनीकांत पोस्टर

“याच एक उदाहरण म्हणजे त्यांची स्टाइल आहे, जी त्यांच्या पहिल्या चित्रपटापासून आजपर्यंत बदललेली नाही.”

‘अ बर्ड्स आय व्ह्यू ऑफ ब्रँड रजनीकांत’ नावाचा रिसर्च पेपर सांगतो की, रजनीकांत यांनी आपल्या चित्रपटांच्या पलीकडं जाऊन वेगवेगळ्या वर्गातील लोकांना आकर्षित केलं आहे.

जसं की, पडद्यावर बोलले गेलेले त्यांचे पंच डायलॉग, ‘अन्नामलाई’, ‘उझैप्पाली’, ‘वीरा’ आणि ‘मुथू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या सामान्य माणसांचा त्यांच्या भूमिका आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचं सरळ वर्तन यांचा समावेश आहे.

रिसर्च पेपरनुसार, या सर्व गोष्टींनी ‘रजनी’ या ब्रँडला आणखी मजबूत केलं आहे.

यात म्हटलं आहे, “अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांसारखे भारतीय सुपरस्टार अनेक जाहिराती तसेच ब्रँड्सचा प्रचार करतात. पण रजनीकांत सार्वजनिकरीत्या व्यावसायिक ब्रँड्सचा कोणत्याही प्रकारे प्रचार करत नाहीत.”

असं असलं तरी, व्यावसायिक फायद्यासाठी ‘रजनी’ यांच्या प्रतिमेचा वापर केला गेला आहे.

उदाहरणार्थ, जपानच्या ‘टोहाटो’ या फूड कंपनीनं जपानमध्ये आपल्या उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी रजनीकांत यांच्या प्रतिमेचा वापर केला होता.

रजनीकांत 1995 मध्ये आलेल्या ‘मुथू’ या चित्रपटाच्या डब व्हर्जनच्या माध्यमातून जपानमध्येही लोकप्रिय झाले होते.

चित्रपटांचं व्यावसायिक यश

2023 मध्ये आलेल्या ‘जेलर’ या चित्रपटाच्या कथेवर रजनीकांत यांच्या ‘बाशा’ या चित्रपटाचा प्रभाव दिसून येतो.

ज्यामध्ये, एक निवृत्त जेलर आपल्या मुलाची हत्या करणाऱ्यांशी बदला घेण्यासाठी आपल्या शांत कौटुंबिक आयुष्यातून बाहेर पडतो आणि हिंसेचा मार्ग स्वीकारतो.

त्यानंतर, तो नेमका कोण आहे आणि त्यानं भूतकाळात काय-काय केलं होतं, हे फ्लॅशबॅक आणि इतर पात्रांच्या माध्यमातून सांगितलं जातं.

मोहनलाल, शिवराजकुमार, विनायकन आणि जॅकी श्रॉफ यांसारख्या इतर भाषांमधील नामांकित कलाकारांनी सांगितलं होतं की, त्यांनी हा चित्रपट केवळ ‘रजनीकांत यांच्यासाठी’ केला होता.

रजनीकांत यांच्या एका पंच डायलॉगवर एक गाणंसुद्धा तयार करण्यात आलं होतं, ज्याचा वापर ‘जेलर’मध्ये करण्यात आला होता.

रजनीकांत 1995 मध्ये आलेल्या ‘मुथू’ या चित्रपटाच्या डब व्हर्जनच्या माध्यमातून जपानमध्येही लोकप्रिय झाले होते.

कोणत्याही चित्रपटाला कला, उत्तम कथा, पटकथा किंवा समाजासाठी चांगला संदेश यांव्यतिरिक्त व्यावसायिक यशाच्या आधारावरही ओळख मिळते. तसं पाहिलं तर ‘जेलर’ने 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. चित्रपट निर्मिती कंपनीनं ही माहिती सार्वजनिक केली होती.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सध्याच्या मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांच्या व्यावसायिक यशाशी तुलना केल्यास हा एक महत्त्वाचा आकडा आहे.

‘सर्वच चित्रपट मोठं यश मिळवतील हे आवश्यक नाही’

सर्वच चित्रपट मोठं यश मिळवतील हे आवश्यक नाही. असं असलं तरी, ‘सुपरस्टार’ रजनीकांत यांचे सर्वच चित्रपट व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप मोठं यश मिळवतात असंही नाही.

याचं एक मोठं उदाहरण 2002 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाबा’ हा चित्रपट आहे.

रजनीकांत यांनी ‘बाबा’ची पटकथा लिहिली होती आणि त्याची निर्मितीही केली होती. हा चित्रपट अपयशी ठरला, पण त्याच्या अपयशाचा त्यांच्या पुढील ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाच्या मोठ्या यशावर काहीही परिणाम झाला नाही.

जे दीपा म्हणतात, ‘चंद्रमुखी’ मध्ये इंटरवलपूर्वीचे अनेक प्रसंग रजनीकांत यांच्याशिवाय पुढे सरकतात. चित्रपटाच्या पटकथेत ज्योतिकाच्या पात्राला बरंच महत्त्व देण्यात आलं होतं.

मात्र, “असं असूनही रजनीकांत यांनी या चित्रपटात काम केलं. कारण त्यांचा त्यांच्या ‘ब्रँड’वर विश्वास होता.”

रजनीकांत यांना आपली कमकुवत बाजू माहितीये

आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला रजनीकांत यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या होत्या.

‘पथिनारु वयथिनिले’, ‘मूंद्रू मुदिचु’, ‘गायत्री’ आणि ‘अवर्गल’ यामध्ये त्यांनी साकारलेली पात्रं अशी होती, ज्यांना स्वतःला एक ‘ब्रँड’ म्हणून प्रस्थापित करण्याची इच्छा असलेला कोणताही अभिनेता स्वीकारण्यास कदाचित संकोचला असता.

रजनीकांत यांनी 'बाबा'ची पटकथा लिहिली होती आणि त्याची निर्मितीही केली होती. हा चित्रपट अपयशी ठरला

‘ग्रँड ब्रँड रजनी: ब्रँड मॅनेजमेंट द रजनीकांत वे’ नावाच्या पुस्तकात लिहिलं आहे, “रजनीकांत पडद्यावर एका अशा खलनायकाच्या रूपात समोर आले, ज्यांना लोक पसंत करत असत. त्यांच्या नकारात्मक भूमिकांनी त्यांना खूप सकारात्मक परिणाम सुद्धा दिले.”

“ते जेव्हा एखाद्या चित्रपटात व्हिलन म्हणून दिसत, तेव्हा सर्वात जास्त टाळ्या त्यांनाच मिळत. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही एक नवीन गोष्ट होती.”

याच आधारावर जे दीपा म्हणतात की, रजनीकांत यांना आपली कमकुवत बाजू चांगलीच माहीत होती.

त्या म्हणतात, “रजनीकांत यांना माहीत होतं की, जेव्हा त्यांनी चित्रपटांमध्ये पाऊल ठेवलं, तेव्हा चित्रपटसृष्टी गडद रंगाच्या त्वचेच्या कोणत्याही अभिनेत्याला सहजासहजी हिरो म्हणून स्वीकारणार नाही.”

“म्हणून त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या व्हिलनच्या भूमिका वेगळ्या अंदाजात साकारल्या. त्यांनी या भूमिका अशा प्रकारे साकारल्या की लोकांना वाटावं, दुसरा कोणताही अभिनेता त्यांची जागा घेऊ शकत नाही.”

रजनीकांत यांनी 1980 आणि 1990 च्या दशकात अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दुसऱ्या हिरोच्या (साइड हिरो) किंवा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये काम केलेलं होतं. यामध्ये विशेषतः अशा चित्रपटांचा समावेश होता, ज्यांमध्ये अमिताभ बच्चन हिरो होते.

जे दीपा म्हणतात, “त्यांनी मैत्रीसाठी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. यामुळे बॉलिवूडमध्येही त्यांच्या चाहत्यांचा एक वर्ग तयार झाला.”

“असं असूनही त्यांनी तिथे मुख्य हिरो बनण्याचा प्रयत्न केला नाही. ते बॉलिवूडमधील सौंदर्यासंदर्भात असलेल्या नियमांना जाणुन होते.”

 जेव्हा एखाद्या चित्रपटात रजनीकांत व्हिलन म्हणून दिसत, तेव्हा सर्वात जास्त टाळ्या त्यांनाच मिळत. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही एक नवीन गोष्ट होती.

“परंतु बॉलिवूडच्या चित्रपटांनी त्यांना 1990 च्या दशकातच ‘पॅन इंडिया’ स्टार बनवलं होतं. यामुळे त्यांच्या तमिळ चित्रपटांनाही तिथं लोकांचं लक्ष मिळालं.”

जे दीपा म्हणतात, “रजनीकांत यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला तसेच कारकिर्दीच्या शिखरावर ज्या गोष्टींची अत्यंत काळजीपूर्वक हाताळणी केली. नंतर त्यांच्यासाठी कथा लिहिताना दिग्दर्शकांनीही त्याच गोष्टींची काळजी घेण्यास सुरुवात केली.”

निर्मात्यांचा पाठिंबा

गेल्या काही वर्षांत रजनीकांत यांच्या ‘दरबार’, ‘अन्नात्थे, ‘लाल सलाम’ आणि ‘वेट्टैयन’ यांसारख्या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणं यश मिळालं नाही.

असं असूनही रजनीकांत सतत ‘जेलर’, ‘कुली’ आणि ‘जेलर 2’ यांसारख्या मोठ्या स्तरांवर बनवलेल्या चित्रपटांमध्ये हिरोची भूमिका साकारत आहेत.

चित्रपट निर्माते जी. धनंजय म्हणतात, “आजही अनेक निर्माते रजनीकांत यांच्यासोबत चित्रपट बनवू इच्छितात.”

“जोपर्यंत रजनीकांत स्वतः नकार देत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या ‘सुपरस्टार’ असण्याच्या प्रतिमेमुळे किंवा ‘ब्रँड’मुळे त्यांचे चित्रपट बनत राहतील.”

धनंजय म्हणतात, ‘जेलर’ आणि ‘जेलर 2’, दोन्ही चित्रपट ‘रजनी’ नावाच्या ब्रँडला समोर ठेवूनच बनवले गेले आहेत.”

“चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवशी होणारी कमाई आणि बॉक्स ऑफिसवरील एकूण कमाईचे सर्व अंदाज रजनीकांत यांची लोकप्रियता आणि त्यांच्या ब्रँडच्या किमतीला आधार बनवूनच लावले जातात.”

“या चित्रपटांशी जोडलेल्या अपेक्षा आणि कमाईचे अंदाज ठरवण्यात रजनीकांत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात.”

रजनीकांत यांनी 1980 आणि 1990 च्या दशकात अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दुसऱ्या हिरोच्या (साइड हिरो) किंवा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये काम केलेलं होतं. यामध्ये विशेषतः अशा चित्रपटांचा समावेश होता, ज्यांमध्ये अमिताभ बच्चन हिरो होते.

ते म्हणतात, ‘जेलर 2’ नक्कीच पहिल्या ‘जेलर’ चित्रपटाचे कमाईचे विक्रम मोडून काढेल.”

‘कुली’ चित्रपटाशी संबंधित एका कार्यक्रमात रजनीकांत म्हणाले होते, “आता माझं वय झालं आहे. जसं की, 1950 च्या दशकातील गाडीचं मॉडेल, जे अनेक लाख किलोमीटर चाललेलं आहे.”

“म्हणून मी चित्रपटाच्या टीमला सांगितलं होतं की, माझ्याकडून खूप जास्त काम करून घेऊ नका आणि माझी काळजी घ्या.”

चित्रपटांमध्ये आणि मंचावर रजनीकांत यांचं व्यक्तिमत्व एखाद्या स्टारसारखं नाही, तर सर्वसामान्य माणसाप्रमाणे असल्याचं दिसतं.

यालाच ‘रजनी’ नावाचा ब्रँड इतक्या मोठ्या काळापर्यंत टिकून राहण्याचं एक महत्त्वाचं कारण मानलं जातं.

‘ग्रँड ब्रँड रजनी’ पुस्तकात लिहिलं आहे, “जर रजनीकांत यांचा परिचय हे सांगून करून दिला असता की ‘हेच पुढचे सुपरस्टार आहेत’ किंवा ‘हेच स्टाईल किंग आहेत’, तर ‘रजनी’ नावाचा ब्रँड कधीच तयार झाला नसता.”

“कोणत्याही ब्रँडला हे स्पष्ट माहीत असलं पाहिजे की, तो काय करू शकतो आणि काय नाही. रजनीकांत ही गोष्ट उत्तम प्रकारे समजतात.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC