Source :- BBC INDIA NEWS

नार्वेकरांमुळे बेघर झाल्याचा अलिबागच्या आदिवासींचा आरोप, काय आहे हे प्रकरण? – ग्राऊंड रिपोर्ट
रायगडमधील अलिबागच्या म्हात्रोळी वाडीत राहणाऱ्या 20 आदिवासी कुटुंबांची घरं मार्च 2024 मध्ये बुलडोझर लावून पाडण्यात आल्याचा आरोप आहे. पिढ्यान् पिढ्या राहत असलेल्या घरांना संरक्षण मिळायला हवं होतं, मात्र आपल्याला जबरदस्तीने बेघर करण्यात आल्याचं या कुटुंबांचं म्हणणं आहे.
वादग्रस्त सर्वे क्रमांक 148/1 ही जमीन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी नार्वेकर यांनी खरेदी केली होती. या प्रकरणात आदिवासींचे आरोप काय आहेत? 2017 च्या शासननिर्णयात नेमकी काय तरतूद आहे? याविषयीचा रिपोर्ट.
आदिवासींनी केलेल्या आरोपांवर बीबीसी मराठीनं राहुल नार्वेकर त्यांच्या कुटुंबीयांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे.
रिपोर्ट- अल्पेश करकरे
शूट- शार्दुल कदम
एडिट- निलेश भोसले
प्रोड्युसर- प्राजक्ता धुळप
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC



