Source :- ZEE NEWS

Independence From Pakistan After Balochistan freedom calls grow In Sindh : पाकिस्तानला मोठा झटका बसणार आहे. अंतर्गत कलहामुळे आता पाकिस्तानचा नाकाशाच बदलणार आहे. पाकिस्तानचे दोन नाही तर तीन तुकडे होणार आहेत.  बलोचिस्तान नंतर आणखी एक मोठ्याने भूभागाने स्वतंत्र देशाची घोषणा केली आहे. स्वतंत्र देशाच्या मागाणीसाठी या प्रांताने बलोचिस्तान प्रमाणे आंदोलने सुरु केली आहेत. 

बलोचिस्तानचे नेते मीर यार बलोच यांनी आज, 9 मे 2025  पाकिस्तानपासून बलोचिस्तानचे स्वातंत्र्य जाहीर केले आहे. त्यांनी भारताला बलोचिस्तानला ओळख देण्याचे आणि नवी दिल्लीत दूतावास उघडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, संयुक्त राष्ट्रांकडून शांतितंत्र्य पाठवण्याची आणि पाकिस्तानी लष्कराला माघार घेण्याची मागणी केली आहे.

मीर यार बलोच यांनी ट्वीट करून माहिती दिली की बलोचिस्तानचे स्वातंत्र्य हे आमच्या लोकांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. आम्ही भारतासारख्या मित्र राष्ट्रांकडून पाठिंबा अपेक्षित करतो, जे आमच्या न्याय्य लढ्याला समर्थन देऊ शकतात.  संयुक्त राष्ट्रांनी या संघर्षात आम्हाला शांतितंत्र्य पाठवून आम्हाला मदत करावी, जेणेकरून आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा मार्ग सुरक्षित करू शकू. बलोचिस्तान हे पाकिस्तानचे सर्वात मोठे प्रांत असूनही, तेथील विकास आणि लोकसंख्या कमी आहे. या प्रदेशात अनेक दशकांपासून वेगवेगळ्या गटांकडून स्वातंत्र्याच्या मागण्या होत आहेत.

बलोचिस्तान पाठोपाठ आता पाकिस्तानातील सिंध प्रांतातही स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली आहे. सिंधला स्वतंत्र देश म्हणून निर्माण करण्याची मागणी करणाऱ्या राजकीय गट जय सिंध फ्रीडम मूव्हमेंट (जेएसएफएम) ने रस्त््यावर उतरुन आंदोलन देखील सुरु केले आहे. 

सिंध प्रांत का करत आहे स्वतंत्र देशाची मागणी?

पाकिस्तानातील सिंधमध्ये सिंधी ओळख आणि स्वायत्ततेच्या मागणीसाठी दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. आता ही मागणी स्वातंत्र्याकडे वाटचाल करत आहे. पाकिस्तान सरकार संस्थात्मक दडपशाहीद्वारे सिंधी संस्कृती नष्ट करत आहे असा सिंधी लोकांचा आरोप आहे. 2022 च्या अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या अहवालात सिंधमध्ये न्यायालयीन हत्या आणि विकृत मृतदेह सापडण्याच्या व्यापक घटनांकडे लक्ष वेधण्यात आले. विशेष म्हणजे सिंध प्रांत 1936 ते 1955 पर्यंत ब्रिटिश भारतातील एक प्रांत होता आणि त्यानंतर तो पाकिस्तानचा भाग बनला.

SOURCE : ZEE NEWS