Source :- ZEE NEWS

IMF Loan To Pakistan: पाकिस्तानने पुन्हा एकदा दहशतवादाला समर्थन देत जागतिक समुदायाला धक्का दिला आहे. IMF कडून पहिला हप्ता मिळालेल्या 1 अब्ज डॉलरच्या कर्जाचा वापर पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या कुटुंबांना भरपाई देण्यासाठी केला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांना पाकिस्तानने 10 लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केलीय आहे. यात जिहादी दहशतवाद्यांना शहीद म्हणून सन्मान देण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या कृत्याचा जगात संताप व्यक्त केला जात आहे. 

सर्वात मोठा धक्कादायक बाब म्हणजे UN घोषित दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरच्या 14 कुटुंबीयांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानने त्याला 14 कोटी रुपयांची भरपाई देण्याची शक्यता वर्तवली आहे. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर संताप व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात आहे. कर्जबाजारी पाकिस्तान सातत्यानं आपला पदर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF समोर पसरत आला. IMF कडे पाकनं पुन्हा मदतीची याचना केली होती. धोका ओळखून भारतानं पाकिस्तानला मदत करू नये अशी भूमिका मांडली. मात्र, तरीही भारताचा विरोध डावलून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 8 हजार 500 कोटी रूपयांचा निधी  पाकिस्तानला दिले. 

2023 मध्येही पाकला IMF ने 7.5 अब्ज डॉलर्सची मदत केली होती. त्यातून अर्थव्यवस्था सावरल्याचा पाकिस्ताननं सांगितलं. त्यामुळे पुन्हा कर्ज मागताच ते पाकला दिलं गेलं. मात्र सीमापार दहशतवादाला केलेली ही मदत होईल तसंच यातून जागतिक मूल्यांची थट्टा केली गेली, असं म्हणत भारतानं आपला निषेध नोंदवला. या पैशांचा विनियोग पाकनं योग्य कार्यासाठी दाखवला तरी त्या आडून दहशतवादी कारवाया वाढतील अशी भीती भारतानं व्यक्त केली होती. शेवटी तेच घडलं आहे. पाकने कर्जाच्या पैशातून  जिहाद कुटुंबीयांना 10 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.

SOURCE : ZEE NEWS