Source :- ZEE NEWS
China Technology Failed In India Pakistan War: काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. पाकिस्तानवर भारताने 6 आणि 7 मे च्या मध्यरात्री हल्ला केला. पाकिस्तानच्या भूमीबरोबरच पाकव्यप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांना भारताने लक्ष्य केलं. पाकिस्तानबरोबरच दहशतवादी बेसावध असताना भारताने अचानक केलेल्या या हल्ल्यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं सांगितलं जात आहे. भारताच्या या कारवाईने खवललेल्या पाकिस्तानकडून 7 तारखेच्या सांयकाळपासून पाकिस्तानकडून ड्रोन्सबरोबरच वेगवगेळ्या क्षेपणास्रांच्या माध्यमातून भारताच्या भूमीवरील शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र हे सर्व प्रयत्न भारतीय लष्कर आणि संरक्षण दलांकडून हाणून पाडण्यात आले आहेत.
भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पण…
पाकिस्तानकडून गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. मात्र हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. विशेष म्हणजे पाकिस्तानचा मित्र देश असलेल्या चीनकडून मिळालेली अनेक शस्रं भारतीय हल्ल्यासमोर निष्प्रभ ठरल्याचं दिसून आलं. पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी भारतीय ठिकाणांना ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि जेट विमानांनी लक्ष्य केले, पण सर्व हल्ले अयशस्वी ठरले. पाकिस्तानने केलेले प्रयत्न आणि त्यांना मिळालेले अपयश पाहिल्यास भारताने पाकिस्तानवर हल्ला केला मात्र उत्तर देताना चीनवर अती विश्वास ठेवल्यानेच पाकिस्तानचा घात झाल्याचं दिसत आहे. नेमकी कुठे कुठे पाकिस्तानची फिजिती झाली पाहूयात…
पाकिस्तानला चीनकडून मिळालेली 5 शस्त्रं भारतीय संरक्षण दलासमोर ठरली निष्प्रभ:
1) पीएल-15 ई क्षेपणास्त्र फेल: पाकिस्तानने भारतावर पीएल-15 ई क्षेपणास्त्र डागले. मात्र हे क्षेपणास्र भारताच्या भूमीवरील निश्चित टार्गेट गाठण्याआधीच हवेत नष्ट झाले. होशियारपूर, पंजाब येथे एक पूर्णतः सुरक्षित स्थितीत पीएल-15 लांब पल्ल्याचे हवाई क्षेपणास्त्र आढळले. हे क्षेपणास्र पाकिस्तानच्या जेएफ-17 लढाऊ विमानातून डागले गेले होते पण त्याचा स्फोट झाला नाही. होशियारपूरमध्ये सापडलेले हे पीएल-15 क्षेपणास्त्र चीनच्या शस्त्रांची विश्वासार्हता कमी करत आहे.
2) एच क्यू-9 हवाई संरक्षण प्रणाली निष्प्रभ: भारतीय हेरोप (Harop) लोटरिंग म्युनिशनने लाहोरमधील चिनी बनावटीच्या एचक्यू-9 बी हवाई संरक्षण प्रणालीचा नाश केला. या घटनेनंतर चिनी शस्त्रांच्या विश्वासार्हतेवर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.
3) जेएफ-17 लढाऊ विमाने भारताने पाडली: पाकिस्तानच्या जेएफ-17 लढाऊ विमानांचा वापर केला गेला, पण भारतीय हवाई दलाने त्यांना पाडले.
4) क्रूझ क्षेपणास्त्रांचा अयशस्वी वापर: पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात पीएल-15 ई लिहिलेल्या क्रूझ क्षेपणास्त्राचे अवशेष आढळले.
5) चिनी तंत्रज्ञान फेल: पाकिस्तानला चीनकडून मिळालेली अत्याधुनिक शस्त्रेही भारतासमोर निष्प्रभ ठरली.
ही यादी पाहिली तर चीनमुळेच पाकिस्तान अधिक अडचणीत आल्याचं स्पष्ट होतं आहे. मित्रराष्ट्र असलेल्या चीनवर आणि त्यांच्याकडून मिळालेल्या युद्ध सामृग्रीवर अतीविश्वास ठेवणं पाकिस्तानला महागात पडताना दिसत आहे.
SOURCE : ZEE NEWS