Source :- ZEE NEWS

Munir Shamshad Mirza: ऑपरेशन सिंदूरनंतर गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानने भारतातील अनेक भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने पाकिस्तानच्या विविध प्रमुख शहरांवर संयुक्त हल्ले सुरू केले. आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त समोर येतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या जागी शमशाद मिर्झा यांना लष्करप्रमुख बनवले जाईल. या बातमीने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानी अधिकारी परदेशात पळायला सुरुवात 

अनेक पाकिस्तानी लष्करी अधिकारी परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसले. विमानतळाभोवती उच्चपदस्थ अधिकारी विमान पकडण्याचा प्रयत्न करताना दिसले. ही बातमी समोर येताच पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. भारतीय हल्ल्यांची तीव्रता आणि अचूकता पाहून पाकिस्तानी नेतृत्वात भीती पसरली आहे. काही अधिकारी परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानमध्ये या घटनेच्या चर्चेमुळे राजकीय आणि लष्करी गटांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. उच्च अधिकारी नागरिकांना युद्धात ढकलून देश सोडून गेले तर आमचे संरक्षण कोण करेल? असा प्रश्न पाकिस्तानचे नागरिक विचारतायत.

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलावर हल्ला 

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतातील अनेक भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने तातडीने कारवाई करत हे सर्व ड्रोन अडवले आणि त्यांना पाडण्यात यश मिळवले. पाकिस्तानने भारतातील अनेक संवेदनशील भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने हल्ला सुरू केला. पाकिस्तानची अनेक मोठी शहरे भारताच्या हल्ल्याच्या कक्षेत आहेत. भारतीय हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आलंय.

SOURCE : ZEE NEWS