Source :- ZEE NEWS

India Pakistan War : पहलगाममध्ये (Pahalgam terror attack) भ्याड दहशतवादी हल्ला घडवून आणल्यानंतर पाकिस्तानच्या या कटकारस्थानांना भारतानं सडेतोड उत्तर दिलं. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरअंतर्गत ही कारवाई करण्यात आली, जिथं भारतानं पाकमधील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले. या हल्ल्यानं अर्थातच पाकिस्ताननं थयथयाट केला आणि भारताच्या हल्ल्याचा निषेध केला. 

7 मे 2025 रोजी रात्रीच्या वेळी पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारतावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा भारताच्या भक्कम संरक्षक भींतीपुढं टिकाव धरू शकला नाही. भारताशी सुरु असणाऱ्या याच संघर्षाच्या दरम्यान आता म्हणजे 24 तासांतच पाकिस्ताननं गुडघे टेकत थेट इराणकडून मदत मागितली आहे. 

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्ताननं भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आता मात्र सूत्रांच्या माहितीनुसार याच पाकिस्तानचा शस्त्रसाठा तळाशी गेल्याचं म्हटलं जात आहे. 

भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्याआधीच पाकिस्ताननं तुर्कियेकडून शस्त्रसाठ्याची मोठी खेप मागवली होती. ज्यानंतर तुर्कीच्या वायुदलाची लढाऊ विमानं पाकिस्तानमध्ये लँड झाली. त्याच्या काही दिवसांनंतरच तुर्कीच्या एका युद्धनौकेनंही पाकिस्तानातील सागरी हद्दीत प्रवेश केला होता. प्रत्यक्षात मात्र तुर्कीकडून पाकला अशी कोणतीही मदत देऊ केल्याची बाब स्वीकारली नाही. 

इराणकडून मागितले ड्रोन…

इराणनं यंदाच्याच वर्षी शाहिद सीरीजमधील ड्रोनचे अद्ययावत वर्जन  शाहिद-149 ‘गाजा’ ऑपरेशनल केले होते. ज्याची मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली. ही एक मानवरहित युद्धविमान प्रणाली असून, माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तांनुसार इराणचं हे ड्रोन 500 ते 1000 किमीपर्यंत मारा करण्यासाठी सक्षम असून, त्यामध्ये एवियोनिक्स सिस्टीम लावण्यात आली आहे. या गाजामध्ये इलेक्ट्रो-ऑप्टिकल आणि इंफ्रारेड सेंसर, लेजर रेंजफाइंडर, सॅटेलाईट कम्युनिकेशन अँटिनासुद्धा लावण्यात आला आहे, ज्यामाध्यमातून 500 किमीपर्यंतच्या क्षेत्रावर लक्ष ठेवता येतं. 

SOURCE : ZEE NEWS