Source :- ZEE NEWS
Jyoti Malhotra Inside Story: ज्योती मल्होत्राच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आलीय. पाकिस्तानला भारताची संवेदनशील माहिती ज्योतीनं पोहोचवलीय.दरम्यान या प्रकरणात ज्योती अटकेत असून तिला 5 दिवसांची पोलीस कोठवडी सुनावण्यात आलीय. दरम्यान ज्योतीनं केलेल्या हेरगिरी प्रकरणाची इनसाईड स्टोरी 24 तासच्या हाती लागलीय. यूट्यबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलीय. दरम्यान तिच्या चौकशीतून आता धक्कादायक माहिती समोर आलीय. ज्योतीनं पाकिस्तानच्या आयएसआयकडून पैसे घेतल्याची माहिती समोर आलीय. मागील 2 वर्षात ज्योतीनं तीनवेळा पाकिस्तानचा दौराही केला. दरम्यान या दौऱ्यात तीनं ISIच्या अधिका-यांची भेट घेतली होती. तसंच या अधिका-यांनी तिची चांगलीच खातिरदारी केली होती.
ज्योती मल्होत्रा आयएसआयकडून पैसे घ्यायची
ज्योती मल्होत्रा आयएसआयकडून पैसे घेत होती. पाक दूतावासात ज्योती पाहुणी म्हणून गेली होती. ज्योतीची पाकिस्तानात फिरण्याची व्यवस्था ISIनेच केली होती. हेरगिरीच्या बदल्यात ज्योतीला पैसे मिळत असल्याची माहिती समोर आलीय. पाकिस्तानी नेत्यांसोबत ज्योतीचे अनेक व्हिडिओ समोर आलेयत. ISI एजंट अली आणि शाहिदलाही ज्योती भेटली होती. शाहिदचा नंबर जट्ट रंधावा नावानं ज्योतीनं सेव्ह केला होता. भारतविरोधी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा तिच्यावर आरोप असून ज्योती पाकिस्तानी उच्चायुक्त दानिशच्या देखील संपर्कात होती. दानिशने ज्योतीला पाकिस्तानचा व्हिसाही दिला होता. ज्योती आणि दानिश भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते. त्यामुळे भारतानं दानिशला पर्सोना नॉन ग्रॅटा म्हणून घोषित केलं होतं. म्हणजेत 24 तासात त्याला भारत सोडण्याचे आदेश 13 मे रोजी देण्यात आले होते. मात्र, त्याच्या संपर्कात असलेल्या ज्योतीला आता अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी ज्योतीला कशी केली अटक?
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय गुप्तचर यंत्रणा खूप सक्रिय होत्या. याच दरम्यान पोलिसांना एक संदेश ट्रॅप झाला होता. हा संदेश हिसारमधून पाकिस्तानला पाठवला गेला होता. या संदेशाच्या डंपचा पाठपुरावा करत लष्करी गुप्तचर यंत्रणा ज्योती मल्होत्राच्या घरी पोहोचली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले. यूट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्राचा नवा व्हिडिओ समोर आलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. या हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्रानं या घटनेसाठी पर्यटकांनाच दोषी ठरवलं होतं. तसंच पहलगाम हल्ल्याच्या आधी ज्योतीनं पहलगाममध्ये गेल्याची देखील माहिती आहे….
ज्योती मल्होत्राचं चीन कनेक्शन
यूट्यूबर ज्योती मल्होत्राचं आता चीन कनेक्शनही समोर आलंय.. पाकिस्तानानंतर ज्योती चीनमध्ये गेल्याची माहिती तपासातून समोर आलीय. ज्योतीला चीनमध्ये व्हिआयपी ट्रीटमेंट आणि सुरक्षा देण्यात आल्याची माहिती आहे. चिनी अधिका-याच्या भेटीनंतर ज्योती तपास यंत्रणांच्या रडारवर आली. दरम्यान ज्योती बांगलादेश, भुतान, थायलंड मध्येही जाऊन आलीय.
ज्योतीसह इतर 4 जणांना अटक
पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या प्रकरणात ज्योती मल्होत्रासह इतर 4 जणांना अटक करण्यात आलीय. देवेंद्र सिंह नावाच्या एका तरुणालादेखील अटक करण्यात आलीय. देवेंद्र सिंह हा पटियाला शिक्षण घेत होता. 2024 मध्ये काही मित्रांसह देवेंद्र सिंह पाकिस्तानमध्ये गेला होता. दरम्यान पाकिस्तानात तो पाक गुप्तचर यंत्रणाच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आलीय. गुप्तचर यंत्रणेनं त्याच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली होती. अरमान नावाच्या एका तरुणाला देखील अटक करण्यात आलीय. अरमान हा सहा महिन्यांपूर्वी दानिशच्या संपर्कात आला होता. अरमानला पैसे आणि काही सीमकार्ड दानिशनं दिले होते. दानिशकडून पैसे घेऊन अरमान दुसऱ्या हेरांना पैसे पोहोचवत होता
ज्योतीसह इतर 4 जणांना अटक
गजाला नावाच्या एका 32 वर्षीय मुस्लीम महिलेला देखील अटक करण्यात आली. पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्यासाठी गजाला दानिशला 4 महिन्यापूर्वी भेटली होती. दानिशनं तिला लग्नाचं आमिष दिलं होतं. दरम्यान गजालाच्या माध्यमातून दानिश त्याच्या हेरांना पैसे पोहोचवत होता. गजालानंतर यामीन मोहम्मद नावाचा युवकदेखील दानिशच्या संपर्कात आला होता. यामीन मोहम्मद हा व्हिजा देण्याच्या कामात दानिशची मदत करत होता.
कठोर कारवाई करण्याची देखील मागणी
भारताची संवेदनशील माहिती ज्योतीनं पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. भारताशी गद्दारी करत ज्योतीनं पाकड्यांना मदत केलीय. त्यामुळे तिच्याविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जातोय, तसंच तिच्यावर कठोर कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात येतेय.
SOURCE : ZEE NEWS