Source :- BBC INDIA NEWS

आयपीएल

फोटो स्रोत, Getty Images

21 मिनिटांपूर्वी

भारत आणि पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रिमिअर लीगचे सामने स्थगित करण्यात आले होते. ते 17 मे पासून पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा BCCI ने केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करत ऑपरेशन सिंदूर स्थगित करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर IPL चे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

उर्वरित एकूण 17 सामने 6 ठिकाणांवर खेळले जाणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे.

बंगळुरू, जयपूर, दिल्ली, मुंबई, लखनौ आणि अहमदाबाद या ठिकाणी हे सामने होतील. क्वालिफायर्स आणि अंतिम सामन्यांचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.

X पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

IPL चे वेळापत्रक

फोटो स्रोत, BCCI

सामने पुढीलप्रमाणे :

  • 17 मे – शनिवार – 7.30 PM – बंगळुरू – रॉयल चॅलेंजर्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
  • 18 मे – रविवार – 7.30 PM – जयपूर – राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स
  • 18 मे – रविवार – 7.30 PM – दिल्ली – दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात टायटन्स
  • 19 मे – सोमवार – 7.30 PM – लखनौ – लखनौ सुपर जायंट्स वि. सनरायजर्स हैदराबाद
  • 20 मे – मंगळवार – 7.30 PM – दिल्ली – चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स
  • 21 मे – बुधवार – 7.30 PM – मुंबई – मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स
  • 22 मे – गुरुवार – 7.30 PM – अहमदाबाद – गुजरात टायटन्स वि. लखनौ सुपर जायंट्स
  • 23 मे – शुक्रवार – 7.30 PM – बंगळुरू– रॉयल चॅलेंजर्स वि. सनरायजर्स हैदराबाद
  • 24 मे – शनिवार – 7.30 PM – जयपूर – पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC