Source :- BBC INDIA NEWS

स्पॅडेक्स मिशनअंतर्गत दोन अंतराळयानं एकमेकांशी जोडली गेली आहेत.

फोटो स्रोत, ANI

30 डिसेंबर 2024

अपडेटेड 37 मिनिटांपूर्वी

अंतराळात यशस्वीरित्या दोन अंतराळयानांचं डॉकिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. स्पॅडेक्स मिशनअंतर्गत ही दोन अंतराळयानं एकमेकांशी जोडली गेली आहेत.

16 जानेवारीला सकाळी 10 वाजता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं याबद्दलची माहिती दिली आहे. हा ऐतिहासिक क्षण असल्याचं इस्रोनं म्हटलं आहे.

Twitter पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Twitter पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Twitterवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

आज जोडण्यात आलेल्या स्पॅडेक्स अ आणि स्पॅडेक्स ब या दोन उपग्रहांमधलं अंतर 15 मीटरवरून हळूहळू 3 मीटरपर्यंत आणलं गेलं. त्यानंतर दोन्ही उपग्रहांमधल्या यंत्रणेची तपासणी करून ते एकमेकांशी जोडले गेले. त्यांच्यामधील जोड स्थिर असल्याची खात्री केली गेली, असं इस्रोनं म्हटलं आहे.

अंतराळात अशा प्रकारे डॉकिंग करणं अत्यंत आव्हानात्मक आहे. ते करण्याचं तंत्रज्ञान भारताकडे असल्याचं दाखवून देण्यात इस्रोला यश आलं आहे.

30 डिसेंबर रोजी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘स्पॅडेक्स मिशन’ अंतर्गत 30 डिसेंबर 2024 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9:58 वाजता दोन उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले.

स्पॅडेक्स मिशन

फोटो स्रोत, ISRO

स्पॅडेक्स मोहिमेचा उद्देश अवकाशयानांना ‘डॉक’ आणि ‘अनडॉक’ करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणं हा आहे.

डॉक करणं म्हणजेच अवकाशात एका अंतराळ यानाला दुसऱ्या यानाशी जोडणं तर अनडॉक करणं म्हणजे जोडलेल्या दोन यानांना वेगळं करणं अशी ही प्रक्रिया असणार आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मते, या मोहिमेसाठी पीएसएलवी-सी60 रॉकेटचा वापर केला गेला.

या प्रक्षेपण वाहनाचा उपयोग उपग्रह आणि इतर विविध पेलोड्स अवकाशात वाहून नेण्यासाठी केला जातो.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

21 डिसेंबर रोजी लाँच व्हेईकलला (प्रक्षेपण वाहन) लाँच पॅडवर नेण्यात आलं होतं. या संबंधित एक व्हीडिओ इस्रोनं एक्स (ट्विटर) वर शेअर केला होता.

या मोहिमेशी संबंधित खास गोष्टी जाणून घेऊयात.

स्पॅडेक्स मिशन काय आहे?

स्पॅडेक्स मिशनमध्ये दोन लहान अंतराळ यानांचा समावेश आहे. प्रत्येक यानाचं वजन अंदाजे 220 किलो आहे. हे दोन्ही भाग एकाच रॉकेटमध्ये ठेवून प्रक्षेपित केले जातील. यांना पीएसएलवी-सी60 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केलं गेलं.

पृथ्वीपासून 470 किलोमीटर अंतरावरील कक्षेत म्हणजे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत हा प्रयोग करण्यात आला. यामध्ये एक चेझर (SDX01) नावाचा उपग्रह आणि दुसरा टार्गेट (SDX02) नावाचा उपग्रह होता.

या मोहिमेचं उद्दिष्ट यशस्वी डॉकिंग करणं त्या डॉक केलेल्या अंतराळयानामध्ये वीज पुरवठा करणं आणि अनडॉकिंगनंतर पेलोड संचालन करणं हे आहे.

उपग्रह

फोटो स्रोत, ISRO

अवकाशात एका अंतराळयानाला दुसऱ्या यानाशी जोडण्याला ‘डॉकिंग’ करणं म्हणतात तर जोडलेल्या दोन यानांना वेगळं करण्याला ‘अनडॉकिंग’ करणं म्हणतात.

या स्पॅडेक्स मिशनअंतर्गत एखाद्या अंतराळ यानाला ‘डॉक’ आणि ‘अनडॉक’ करण्याच्या क्षमतेचं प्रदर्शन केलं जाणार होतं.

स्पॅडेक्स मिशन इतकं खास का आहे?

स्पॅडेक्स मिशन हे कमी खर्चात विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचं प्रदर्शन दाखवण्याचं मिशन देखील आहे.

भारताच्या अंतराळ मोहिमांशी संबंधित असलेल्या महत्त्वाकांक्षांच्या दृष्टीनं हे तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे.

यामध्ये भारतीय अंतराळ स्थानकाची निर्मिती करणं आणि भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणं यासारख्या मोहिमांचा समावेश आहे.

पीएसएलवी-सी60

फोटो स्रोत, ISRO

एखादी सामान्य मोहीम पार पाडण्यासाठी अनेक रॉकेट प्रक्षेपित करणं आवश्यक असतं तेव्हा त्याला ‘इन-स्पेस डॉकिंग’ तंत्रज्ञानाची आवश्यक असते.

जसे, स्पॅडेक्स मिशन अंतर्गत अंतराळात पाठवलेले दोन उपग्रह चेझर (SDX01) आणि टार्गेट (SDX02) हे दोघंही पृथ्वीभोवती प्रचंड वेगानं फिरतील.

दोघांनाही एकाच गतीनं एकाच कक्षेत ठेवलं जाईल, परंतु सुमारे 20 किलोमीटर अंतरानं वेगळं केलं जाईल. याला ‘फार रेन्डेव्हस’ असंही म्हणतात.

स्पॅडेक्स मिशन भारतासाठी का महत्त्वाचं आहे?

स्पॅडेक्स मिशनच्या यशानंतर भारत हा स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असणारा जगातील चौथा देश ठरला आहे. अंतराळात डॉक करणं हे एक कठीण काम आहे.

सध्या केवळ अमेरिका, रशिया आणि चीन हे स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानामध्ये सक्षम असल्याचं मानलं जातं. त्यामुळेच स्पॅडेक्स मिशनद्वारे भारताला स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवण्याची ही संधी होती.

पीएसएलव्ही रॉकेट

फोटो स्रोत, ISRO

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं होतं की, हे मिशन स्पेस डॉकिंगमध्ये प्रभुत्व मिळवून भारताचं नाव महत्त्वाच्या देशांच्या यादीत घेऊन जाईल.

ते म्हणाले की, “चांद्रयान-4 आणि भविष्यातील भारतीय अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसारख्या दीर्घकालीन मोहिमांसाठी डॉकिंग तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे.”

तसंच गगनयान मोहिमेच्या यशासाठीदेखिल ही मोहीम अतिशय महत्त्वाची असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

मोहिमेत काय काय होतं?

या मोहिमेचा एक उद्देश डॉक केलेल्या अंतराळ यानामधील इंधनाचं हस्तांतरण करणं हाही होता. कारण स्पेस रोबोटिक्ससारख्या भविष्यातील प्रयोगांसाठी ते अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतं.

याशिवाय अंतराळयानाचं संपूर्ण नियंत्रण आणि अनडॉकिंगनंतर पेलोडचं ऑपरेशन यासारख्या गोष्टी देखील या मोहिमेच्या उद्दिष्टाचा भाग आहेत.

स्पॅडेक्स मिशन

फोटो स्रोत, ISRO

स्पॅडेक्स मोहिमेत पीएसएलवीचा चौथा टप्पा म्हणजे पीओईएम-4 (पीएसएलवी ऑर्बिटल एक्सपेरीमेंटल मॉड्यूल) देखील प्रयोगांसाठी वापरला जाईल.

या टप्प्यात शैक्षणिक संस्था आणि स्टार्टअप्सचे 24 पेलोड असतील.

या मोहिमेअंतर्गत इस्रोनं, ताशी 28,800 किलोमीटर वेगानं फिरणाऱ्या दोन उपग्रहांना डॉक करण्याचा प्रयत्न केला. हे एक आव्हानात्मक काम होतं ते यशस्वी झालं आहे.

चांद्रयान-4 मोहीम काय आहे?

चांद्रयान-4 मोहिमेत, एलएमव्ही-3 आणि पीएसएलव्ही या दोन रॉकेटचा वापर करून वेगवेगळ्या उपकरणांचे दोन संच चंद्रावर प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.

यामध्ये अवकाशात पाठवण्यात आलेलं यान चंद्रावर उतरून आवश्यक माती आणि खडकांचे नमुने गोळा करेल आणि ते एका बॉक्समध्ये ठेवेल. नंतर चंद्रावरून पुन्हा पृथ्वीवर परत येईल.

यामध्ये प्रत्येक क्रिया पूर्ण करण्यासाठी वेगवेगळी साधनं तयार करण्यात आली आहेत. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास अंतराळ संशोधन क्षेत्रात भारत खूप पुढे जाईल.

केंद्र सरकारनं या योजनेला मान्यता दिली असून, त्यासाठी 2104 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.

2040 पर्यंत मानवाला चंद्रावर उतरवण्याच्या भारताच्या उद्दिष्टाच्या दिशेनं याकडं पुढचं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे.

चांद्रयान-3

फोटो स्रोत, ISRO

या संदर्भात भारत सरकारच्या विज्ञान प्रसार संस्थेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ टी.व्ही. व्यंकटेश्वरन यांनी मागील चांद्रयान मोहिमांचा हवाला देत बीबीसी तमिळशी संवाद साधला होता .

या वेळी ते म्हणाले होते, “आता आम्ही सविस्तर अभ्यास करण्याच्या दृष्टीनं पुढील टप्प्यासाठी चंद्राची माती आणि खडकांचे नमुने गोळा करू.”

चंद्राच्या पृष्ठभागाचे नमुने गोळा करणं भारतासाठी खूप महत्त्वाचं असल्याचं टीव्ही वेंकटेश्वरन यांनी म्हटलं होतं.

पुढे ते म्हणाले, “आंतरराष्ट्रीय स्तरावर 1967 पासून लागू असलेल्या चंद्र करारानुसार, कोणताही देश चंद्रावर मालकी हक्क सांगू शकत नाही.

त्यामुळे त्या करारानुसार, जे देश त्या गोळा केलेल्या नमुन्यांचं विश्लेषण करण्यास सक्षम आहेत, त्यांच्यासोबत चंद्रावरून आणलेले नमुने वाटले पाहिजेत”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC