Source :- BBC INDIA NEWS

OMR परीक्षा पद्धत

फोटो स्रोत, Getty Images

1 तासापूर्वी

2025 ची NEET – अंडर ग्रॅज्युएट परीक्षा ही पेन अँड पेपर म्हणजे कागद – पेन वापरून सोडवायच्या पद्धतीने होणार आहे. NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हा निर्णय जाहीर केलाय.

2025 च्या NEET UG परीक्षांविषयी आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टी जाहीर करण्यात आल्या आहेत.

NEET – UG परीक्षा कशासाठी असते?

NEET म्हणजे National Eligibility-cum-Entrance Test. भारतभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या (Undergraduate Courses) प्रवेशांसाठी NEET-PG ही परीक्षा घेतली जाते.

नॅशनल मेडिकल कमिशनच्या वतीने नॅशनल टेस्टिंग एजन्सी या परीक्षांचं 2019पासून आयोजन करते.

BDS, आयुर्वेद, योग आणि नॅचरोपथी, युनानी, सिद्ध आणि होमिओपथी – AYUSH च्या कोर्सेससाठी ही परीक्षा द्यावी लागते.

Armed Forces Medical Services (AFMS) च्या मिलिटरी नर्सिग सर्व्हिस – B.Sc नर्सिंग कोर्सेससाठीही ही परीक्षा द्यावी लागेल.

NEET – UG 2025 परीक्षा कशी असेल?

यावर्षी या परीक्षा computer-based mode म्हणजे कम्प्युटरवर घेण्यात येतील असा अंदाज होता, पण यावर्षी मात्र कागद – पेन वापरून परीक्षा द्यावी लागेल असं जाहीर करण्यात आलंय.

2025 च्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम बदलण्यात आलाय. नॅशनल मेडिकल कमिशनच्या nmc.org आणि NTA च्या nta.ac.in या वेबसाईट्सवर अभ्यासक्रमाचा हा तपशील उपलब्ध आहे. या परीक्षेत 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमातील  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्राचा (Physics – Chemistry – Biology) समावेश असेल.

एकूण 3 तास 20 मिनिटांची ही परीक्षा असेल.  यामध्ये 200 प्रश्न असतील त्यातील 180 प्रश्न सोडवावे लागतील. बरोबर उत्तराला 4 मार्क मिळतील, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 मार्क कापला जाईल.

OMR म्हणजे ऑप्टिकल मार्क रेकग्शिन पद्धतीने ही परीक्षा होईल. म्हणजे विद्यार्थ्यांना उत्तराचा पर्याय असणारा गोळा रंगवत आपलं  उत्तर नोंदवावं लागेल. एका दिवशी – एकाच शिफ्टमध्ये, 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

2024 च्या नीट परीक्षेदरम्यान काय घडलं?

2024 च्या नीट युजी परीक्षेचं आयोजन 14 शहरांमध्ये करण्यात आलं होतं, 23 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. पण काही परीक्षा केंद्रांवर गोंधळ झाला. पेपर फुटल्याचे आरोप झाले.

निकाल लागला तेव्हा परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच 67 मुलांना पैकीच्या पैकी 720 गुण मिळाले होते. पूर्ण मार्क्स मिळवणाऱ्या 67 टॉपर्सपैकी 6 जणांनी हरियाणा राज्यातल्या झज्जर जिल्ह्यातल्या एकाच सेंटरमधून परीक्षा दिली होती.

नीट परीक्षेत 1563 विद्यार्थ्यांना दिलेल्या ग्रेस मार्क्सनंतर याबाबत प्रचंड वाद झाला. हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता नंतर एनटीएनं ग्रेस मार्क्स रद्द केले. दरम्यानच्या काळात UGC – NET परीक्षा रद्द करण्यात आली.

YouTube पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

केंद्र सरकारनं नीटची परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या सुबोध कुमार सिंह यांना महासंचालक पदावरून हटवलं. आणि ही परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती.

उच्चस्तरीय समितीने काय शिफारसी केल्या होत्या?

इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन हे या समितीचे अध्यक्ष होते. प्रवेश प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित व्हावी यासाठी यासाठी

NTA कडे नोकरभरतीसाठीच्या कामाचा ताण न देता फक्त प्रवेश परीक्षांसाठीचं काम देण्यात यावं, प्रवेश परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात आणि अनेक सेशन्समध्ये आणि अनेक टप्प्यांमध्ये घेण्यात याव्यात अशा सूचना या समितीने दिल्या होत्या. यातल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल असं केंद्राने सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं.

पण या सूचनांवर 2025 च्या परीक्षांमध्ये अंमलबजावणी करण्यात येणार नाही. परीक्षा काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने शेवटच्या क्षणी या बदलांची अंमलबजावणी करणं कठीण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

शिवाय सगळ्या विद्यार्थ्यांना कमी काळात पेपर सोडवण्याची नवी पद्धत शिकवणंही कठीण असून, शेवटच्या क्षणी बदल झाले असते तर विद्यार्थ्यांवरचा ताण वाढला असता, असंही तज्ज्ञ म्हणतायत. पण गेल्यावर्षी ऑफलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षांदरम्यानच्या घोळांमुळे यावर्षीच्या परीक्षांबद्दल साशंकताही व्यक्त करण्यात येतेय.

APAAR वापरून नोंदणी

परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी NTA ने APAAR म्हणजे Automated Permanent Academic Account Registry चा वापर यावेळच्या NEET साठी करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. सोबतच NEET 2025 ची अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना विद्यार्थ्यांना आधार क्रमांकही वापरावा लागेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC