Source :- ZEE NEWS

Operation Sindoor Indian Attack on Pakistan News in Marathi: भारतीय लष्करातील तिन्ही दलांनी मिळून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि त्याच तळांसंदर्भातील सविस्तर माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं समोर आणली. भारताच्या हल्ल्यात हाफिज सईदच्या मदरशांवर निशाणा साधम्यात आला. सईदच्या मदरशांवर 4 क्षेपणास्त्र डागण्याच आली. तर, बहावलपूरमध्ये मौलाना अजहर मसूदच्या मदरशांवर हल्ला करण्यात आला. 

मसूदच्या मदरशांवर 4 मिसाईल्स पडल्याचा स्थानिकांचा दावा.  भारताच्या या हल्ल्यात मौलाना अजहर मसूद मुख्य निशाण्यावर असल्याचंही म्हटलं गेलं. 

दहशतवाद्यांच्या छावणीत शिजत होते भारतविरोधी कट, माहिती हादरवणारी 

कराची तोरखाम महामार्ग क्रमांक 5 पाशी असणारा मरकझ सुभान अल्लाह मदरसा हा 15 एकरांमध्ये पसरला असून जैश-ए-मोहम्मद बहावलपूर, पंजाब, पाकिस्तान- हे मरकझ जैश-ए-मोहम्मदचे ऑपरेशनल मुख्यालय म्हणून काम करतो. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ल्यासह दहशतवादी योजनांशी संबंधित आहे. पुलवामा हल्ल्यातील गुन्हेगारांना या छावणीत प्रशिक्षण देण्यात आलं होतं. 

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार मरकझमध्ये जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर, जैशचा मुफ्ती रौफ असगर, मौलाना अम्मर आणि कुटुंबीय राहत असल्याची माहिती. सध्याच्या घडीला मसूद रावळपिंडीत गोपनीय ठिकाणी दडून बसल्याची माहिती समोर. या मरकझमध्ये अनेक शस्त्रास्त्र प्रशिक्षणांसह जवळपास 600 कॅड्रेंना प्रशिक्षण दिलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या या छावणीत 2018 मध्ये जीमची सोय करून देण्यात आली. पुढे इथं स्विमिंग पूल सुरू करत जैशच्या कॅड्रेंसाठी अंडर वॉटर कोर्स सुरू करत या मार्गानंही हल्ल्यांसाठी त्यांना तयार केलं जात होतं. पाकमधील अशा अनेक छावण्या त्यांच्या मुख्य हेतूच्या आड भारतविरोधी कारवाया आणि हल्ल्यांचे कट रचत असल्याचं तपासातून उघड झालं. 

1. मर्कज सुभान अल्लाह, जैश-ए-मोहम्मद (JeM), बहावलपूर, पंजाब, पाकिस्तान

कार्यकारी मुख्यालय:  हे ठिकाण जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे ऑपरेशनल मुख्यालय म्हणून ओळखले जाते.
दहशतवादी कारवायांचे केंद्र:* फेब्रुवारी 14, 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याचे नियोजन येथेच करण्यात आले होते.
दहशतवादी प्रशिक्षण: पुलवामा हल्ल्याचे हल्लेखोर याच तळावर प्रशिक्षित झाले होते.
स्थापना:  हे मुख्यालय वर्ष 2000 मध्ये स्थापन करण्यात आले.

2. मर्कज तैयबा, लष्कर-ए-तय्यबा (LeT), नंगल सहदान, मुरीदके, शेखूपुरा, पंजाब, पाकिस्तान

‘अल्मा माटर’ व प्रशिक्षण केंद्र: लष्कर-ए-तय्यबा (LeT) चं सर्वात महत्वाचं प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखलं जातं.
प्रमुख प्रशिक्षण तळ: LeT चे दहशतवादी याच ठिकाणी प्रशिक्षित होतात आणि येथूनच भारताविरुद्ध हल्ल्यांचं नियोजन होतं.
स्थापना: हे केंद्र २००० मध्ये सुरू करण्यात आलं. 

3. सरजल/तेहरा कलान सुविधा, जैश-ए-मोहम्मद (JeM), शकरगढ, जिल्हा नारोवाल, पंजाब, पाकिस्तान

मुख्य लॉन्चिंग तळ: हे ठिकाण जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी JeM चे मुख्य प्रक्षेपण केंद्र आहे.
स्थान: हे तळ सरजल परिसरातील तेहरा कलान गावात एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आहे.
गुप्त ऑपरेशन: आरोग्य केंद्राच्या नावाखाली या तळाचा वापर होतो, जेणेकरून त्याचे खरे उद्दिष्ट लपवता येईल.

4. महमूना जोया सुविधा, हिजबुल मुजाहिद्दीन (HM), सियालकोट जिल्हा, पंजाब, पाकिस्तान

स्थान: कोटली भुट्टा शासकीय रुग्णालयाजवळ, हेड मराळा परिसर, सियालकोट.
ISI चा सहभाग: पाकिस्तानच्या ISI च्या मदतीने नियंत्रणरेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा (IB) लगतच्या शासकीय इमारतींमध्ये अशा लाँच सुविधांची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे दहशतवादी तळ लपवता येतात.
उद्दिष्ट: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी आणि प्रशिक्षण.

5. मर्कज अहले हदीस, बर्नाळा, लष्कर-ए-तय्यबा (LeT), भिंबर जिल्हा, पाकिस्तान-अधिकृत काश्मीर (PoJK)

प्रमुख केंद्र: हे PoJK मधील LeT चे महत्त्वाचे केंद्र आहे, जिथून दहशतवादी आणि शस्त्रास्त्रांची पूंछ, राजौरी आणि रेयासी या भागात घुसखोरी होते.
स्थान: बर्नाळा शहराच्या बाहेर, कोटे जामेल रस्त्यावर.
अंतर: बर्नाळा शहरापासून ५०० मीटर आणि कोटे जामेल रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर.

SOURCE : ZEE NEWS