Source :- ZEE NEWS

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवसानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी दावा केला की, या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले. तथापि, भारतीय अधिकाऱ्यांना मात्र पाकिस्तानच्या या दाव्यावर विश्वास नाही. सुरुवातीच्या तपासात नागरिकांवर गोळीबार करणाऱ्या अतिरेक्यांच्या गटात परदेशी असल्याचं समोर आलं आहे.

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामजवळील एका टेकडीवर किमान 25 पर्यटक आणि एका खोऱ्यातील रहिवाशाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुंबईवरील 26/11 च्या गोळीबारानंतर देशातील नागरिकांवर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. “आमचं याच्याशी काही देणंघणं नाही. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला नकार देतो,” असं आसिफ यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या टीव्ही चॅनेलशी बोलताना सांगितलं.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की, “अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर आम्हीदेखील काळजीत आहोत. मृतांच्या जवळच्या नातेवाईकांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त करतो”. 

पाकिस्तानमधील बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित गट असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचं सांगण्यात येत असल्याने दिल्लीने इस्लामाबादच्या दाव्यावर शंका व्यक्त केली आहे. सुरक्षा यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, पीडित आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवल्यानंतर प्राथमिक चौकशीत चार दहशतवादी ज्यात दोन परदेशी नागरिक असल्याचं मानले जात आहे. 

काश्मीर इस्लामाबादची रक्तवाहिनी आहे असं विधान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी केल्याच्या एका आठवड्यानंतर हा हल्ला झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. 

गेल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये झालेल्या परदेशी पाकिस्तानी अधिवेशनाला संबोधित करताना जनरल मुनीर म्हणाले, “आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे, ती आमची रक्तवाहिनी होती आणि राहील. आम्ही ती विसरणार नाही. आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांना त्यांच्या शौर्यपूर्ण संघर्षात सोडणार नाही”. 

“आपले धर्म वेगळे आहेत, आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. तिथे रचलेल्या द्विराष्ट्रीय सिद्धांताचा हा पाया होता. आपण दोन राष्ट्रे आहोत, आपण एक राष्ट्र नाही,” असे मुनीर यांनी अलिकडच्या काळात त्यांच्या एका जोरदार विधानात म्हटले होते.

“आपले धर्म वेगळे आहेत, आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. तिथे घातल्या गेलेल्या द्विराष्ट्रीय सिद्धांताचा पाया हाच होता. आपण दोन राष्ट्र आहोत, आपण एक राष्ट्र नाही,” असं मुनीर यांनी म्हटलं होतं. 

मुनीर यांच्या वक्तव्यावरील प्रश्नांना उत्तर देताना, परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गेल्या गुरुवारी म्हटलं होतं, “परदेशात असणारी एक गोष्ट तुमची रक्तवाहिनी कशी असू शकते? हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. पाकिस्तानशी त्याचा एकमेव संबंध म्हणजे त्या देशाने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या प्रदेशांची सुटका”.

SOURCE : ZEE NEWS