Source :- ZEE NEWS

Global Burden of Disease: ‘द लॅन्सेट’ या प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकातून एक धक्कादायक रिसर्च समोर आलाय. ज्यातून जगभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे भीषण वास्तव समोर येते. यात तुम्हाला भारतातील महिलांच्या शोषणाची माहितीदेखील देण्यात आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

2023 मध्ये जगभरात 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या एक अब्जहून अधिक महिलांनी बालपणी लैंगिक हिंसेला तोंड दिलंय. याशिवाय जवळपास 60.8 कोटी महिलांना जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसेला सामोरे जावे लागले. उप-सहारा आफ्रिका आणि दक्षिण आशियात ही समस्या सर्वाधिक तीव्र आहे. जिथे एचआयव्ही आणि इतर दीर्घकालीन आजारांची व्याप्ती आधीच जास्त आहे.

कसे केले संशोधन?

शोधकर्त्यांनी ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ म्हणजेच जीबीडी 2023 या मोठ्या अभ्यासाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. हा अभ्यास वॉशिंग्टन विद्यापीठाने समन्वयित केलाय. यातून आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे क्षेत्र आणि कालानुसार मोजमाप केले जाते.15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 1.01 अब्ज मुलींना बालपणात लैंगिक हिंसेचा अनुभव आलाय. तर 60.8 कोटी महिलांना जोडीदाराच्या हिंसाचारामुळे त्रास्त आहेत. 

आरोग्य आणि सामाजिक परिणाम काय?

ही हिंसा केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आणि दीर्घकालीन आरोग्यावरही गंभीर परिणाम करणारी असते. यामुळे चिंता, क्रॉनिक आजार आणि वेळेपूर्व मृत्यूचे धोके वाढवते. कमी उत्पन्न असलेल्या भागांत आरोग्य यंत्रणा दुर्बल आणि महिलांसाठी कायद्याची सुरक्षा अपुरी असल्याने समस्या आणखी गुंतागुंतीची होते. अधिक उत्पन्न असलेल्या देशांतही ही हिंसा तरुण वयस्कांमध्ये प्रमुख आरोग्य जोखीम असल्याची माहिती अभ्यासात देण्यात आली आहे. 

आव्हाने, उपाययोजना काय?

अलीम्स दिल्ली, पीजीआयएमईआर चंडीगड आणि आयसीएमआर-चेन्नई यांच्या संशोधकांनी हे निष्कर्ष मांडले आहेत. हिंसा रोखण्यासाठी मजबूत कायदे, आरोग्य सुविधा आणि जागरूकता मोहिमा राबवाव्यात, असा सल्ला त्यांनी दिलाय. विशेषतः संवेदनशील भागांत तातडीने कृती आवश्यक आहे. जेणेकरून पुढील पिढ्या या वेदनापासून मुक्त होऊ शकतील. ही समस्या सामाजिक बदलाशिवाय सुटणार नसल्याचेही त्यांनी म्हटलंय.

भारतातील वास्तव चिंताजनक 

भारतात जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसेला तोंड देणाऱ्या महिलांचे प्रमाण सुमारे 23 टक्के आहे. 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 30 टक्क्यांहून अधिक महिलांनी आणि 13 टक्के पुरुषांनी बालपणात लैंगिक हिंसेचा सामना केलाय, असे स्टडी सांगते. भारतात 15 ते 49 वर्ष वयोगटातील प्रत्येक पाच महिलांपैकी एकाने जोडीदाराकडून हिंसेला तोंड दिलंय. एकूणच जगात 840 दशलक्ष लोकांना जोडीदार किंवा लैंगिक हिंसेने त्रास झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने नोव्हेंबर 2023 मध्ये जारी केलेल्या अहवालात याबद्दल माहिती दिली आहे. 

FAQ 

१. प्रश्न : जगात किती बायकांना लहानपणी कुणी तरी जबरदस्तीने छेडछाड किंवा बलात्कार केला आहे?

उत्तर : आज जिवंत असलेल्या १५ वर्षांपेक्षा मोठ्या जवळपास १०० कोटी (एक अब्जहून अधिक) बायकांना लहानपणी असताना लैंगिक हिंसाचार सहन करावा लागला आहे. ही आकडेवारी ‘द लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध मासिकाने दिली आहे.

२. प्रश्न : भारतात किती बायकांना नवरा किंवा बॉयफ्रेंड मारतो?

उत्तर : भारतात जवळपास प्रत्येक चौथ्या बाईला (२३ टक्के) नवऱ्याकडून किंवा जोडीदाराकडून मारहाण किंवा लैंगिक जबरदस्ती सहन करावी लागते. म्हणजे ५ पैकी १ बाई नक्कीच अशा हिंसाचाराला बळी पडते.

३. प्रश्न : अशी हिंसा झाली तर बाईच्या आरोग्यावर काय परिणाम होतो आणि काय करायला हवं?

उत्तर : यामुळे खूप मानसिक त्रास, नैराश्य, एचआयव्ही सारखे आजार आणि कधी कधी लवकर मृत्यूही ओढवतो. उपाय म्हणून कडक कायदा, पोलिसांची तात्काळ मदत, चांगली हॉस्पिटल सुविधा आणि घरोघरी जागरूकता पसरवणे गरजेचे आहे. फक्त पोलिसांवर नाही, आपण आपल्या सर्वांवर ही जबाबदारी आहे.

SOURCE : ZEE NEWS