Source :- ZEE NEWS
Difference Between Thanks And Thank You: एखाद्या व्यक्तीप्रती आभार व्यक्त करायचे असतील तर सहसा ‘थँक्स’ किंवा ‘थँक्यू’ या शब्दांचा वापर केला जातो. पण, अगदी सहजपणे वापरल्या जाणाऱ्या या शब्दांमध्ये बराच फरक आहे हे तुम्हाला माहितीये का? यापैकी कोणता शब्द नेमका कधी वापरायचा हे तुमच्या लक्षात येतंय का? या प्रश्नाचं उत्तर मिळवा आणि ते लक्षातही ठेवा बरं!
कधी वापरावं Thanks ?
अनौपचारिकरित्या एखाद्या व्यक्तीप्रती आभार व्यक्त करण्यासाठी ‘थँक्स’ हा शब्द वापरण्यात येतो. सहसा याचा वापर कुटुंबातील सदस्यांसह अशा व्यक्तींसाठी किंवा व्यक्तींप्रती केला जातो ज्यांच्यासोबत तुमचं मैत्रीपूर्ण नातं असतं. ‘थँक्स’ म्हणून अतिशय सहजपणे आभार व्यक्त केले जातात.
उदाहरणार्थ…
अरे… माझ्या मदतीसाठी ‘थँक्स’.
कॉफी दिल्याबद्दल ‘थँक्स’ मित्रा.
‘थँक्स’ , मला लिफ्ट दिल्याबद्दल.
‘थँक्यू’चा वापर कधी करावा?
धन्यवाद म्हणणं किंवा आभार व्यक्त करण्याचा अतिशय औपचारिक मार्ग म्हणजे ‘थँक्यू’ म्हणणं. तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत आहात आणि तिथं तुमच्या जवळच्या वर्तुळापेक्षा त्रयस्त व्यक्तीसोबत तुमचा संपर्क येतोय, तिथं आभार व्यक्त करण्यासाठी ‘थँक्यू’चा वापर करणं योग्य ठरतं.
उदाहरणार्थ…
तुमचा बहुमूल्य वेळ दिलास यासाठी ‘थँक्यू’.
ही भेट फारच छान होती, ‘थँक्यू’.
थँक्स आणि थँक्यू या दोन्ही शब्दांमध्ये अनौपचारिक आणि औपचारिकता इतका काय तो फरक आहे. नम्रतेच्या भावामध्ये गणल्यास थँक यू किंवा थँक्यू या शब्दातून अधिक विनम्रता व्यक्त होते असं म्हटलं जातं.
भाषेचा वापर संवाद सुलभ करण्यासाठी केला जातो. पण, अनेकदा भाषेच्या नियमांकडे अनेकांचच दुर्लक्ष होतं आणि बऱ्याचदा चुकीच्या शब्दांचा वापर विपर्यास होऊन सातत्यानं चुकीच्याच प्रसंगी केला जातो. थँक्स आणि थँक्यूसुद्धा त्याचच एक उदाहरण आहे असं म्हणणं गैर नाही. त्यामुळं आता या शब्दांचा नेमका वापर लक्षात आला असेल तर ही बाब कधीच विसरु नका.
SOURCE : ZEE NEWS