Source :- ZEE NEWS

Extra Marital Affairs : कुठलंही नातं हे विश्वासावर उभं असतं. लग्नाचं नात्याचा पाया हा प्रेमासोबत विश्वासावर उभा असतो. लग्नानंतर एकमेकांना नवरा बायको समर्पित असतात. प्रेमात एकनिष्ठ राहणे हेच सुखी संसाराच रहस्य असतं. लग्नात अनेक चढ उतार येत असतात पण त्यातूनही मार्ग काढणे गरजेचे असतं. तो येणाऱ्या संकटाला कुठल्याही परिस्थितीत तोंड देऊन एकमेकांसाठी खंबीर उभे राहतात, अशी जोडपी सुखी आणि आनंदी आयुष्य जगतात. पण जेव्हा या नात्यात दोघांपैकी एकाही विश्वासघात केला की, सुखी संसाराला तडा जातो. काही क्षणात पायाखालची जमीनच सरकते. असाच एक धक्कादायक प्रकार लग्नाच्या 16 वर्षांनंतर समोर आला आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?

2007 मध्ये लग्न झाल्यानंतर संसाराला 16 वर्ष झाली अन् त्यांना चौथ बाळ होणार होतं. नवऱ्यापेक्षा बायको 8 वर्षांनी लहान होती. तो व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर होता. त्यामुळे त्याला अनेक वेळा फिरतीवर राहावं लागत होतं. सगळं माहिती असताना त्या दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या काही महिन्यातच तिने पहिली गूड न्यूज दिली. आपण वडील होणार हे जाणून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्या संसार सुरु झाला त्यात गोड बातमीही मिळाली…वर्षांनुवर्ष जात होती. पहिल्या बाळानंतर दुसऱ्या बाळाची बातमी आणि मग तिसऱ्या बाळाची गोड न्यूज मिळाली. या 16 वर्षांच्या संसारात तो अनेक वेळा फिरतीवर असायचा…

असं उघडलं रहस्य?

झालं असं की पहिल्या दोनही बाळांच्या जन्माच्या वेळी तो आनंदात होता. पण जेव्हा त्याला 2019 मध्ये तिसऱ्या बाळाची बातमी कळली तेव्हा त्याचा मनात शंकेची पाल चुकचुकली. आपला जास्तच जास्त वेळ हा कामासाठी बाहेर जातो. आपण खूप कमी वेळ घरात असतो. मग तारखांची गणित पाहिली तर आपली बायको तिसऱ्यांदा गर्भवती कशी राहू शकते? असा प्रश्न त्याला पडला. त्याने अखेर पत्नीला विचारलं आणि तिने सांगितलं असे हे बाळ आपलंच आहे. त्यांना तिसरी मुलगी झाली. तो कसाबसा समजला…पण एकदा संशय आल्यावर तो अस्वस्थ होता.

त्यानंतर 2020 साली सत्य समोर आल्यानंतर मोठा धक्का बसल होता. त्याने डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्याला समजलं की, आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत. तेव्हा तो मानसिकरित्या खचून गेला होता. एवढेच नाही, तिने शांगराओ चौथ्या मुलीला जन्म दिला होता. चेन ने गुपचूप जाऊन चाचण्या करून घेतल्या. रिलीज फॉर्ममध्ये त्याचं नाव आणि फेक स्वाक्षरी होती. त्यानंतर हेच मुद्दे घेऊन तो कोर्टात गेला. त्यावेळी न्यायालयाने आदेश दिले की, चेनला त्याच्या दोन मोठ्या मुलींची कस्टडी देण्यात यावी आणि त्याला पत्नीला पोटगी द्यावी लागेल. हे प्रकरण जियांग्शी प्रांतातील डेक्सिंगमध्ये राहणाऱ्या चेन जियांग्शी याच्या आयुष्यातील आहे. 

SOURCE : ZEE NEWS