Source :- ZEE NEWS

Indian Baraat On Wall Street : भारतीय लग्नाची मजाच काही और असते. विधी परंपरेसोबत अनेक संस्कृती जपत जवळपास 5 ते 6 दिवस लग्नाचे सोहळे चालत असतात. लग्न म्हटलं हल्ली नाच गाणे आलीच. वराकडील लग्न असेल तर वधूला घेऊन जाण्यासाठी वर गाडी स्वार होऊन ढोल तशाच्या गजरात वऱ्हाडी नाचत लग्न कार्यालयात जातात. सध्या अशाच एका वरातीची जोरदार चर्चा सुरु आहे. तुम्ही म्हणाल एवढं काय त्यात. तर हे लग्न होतं अमेरिकेतील, ज्याची चर्चा सर्वत्र होतेय. कारण या लग्नाची वरात एवढं भव्य होती की अमेरिकेतील न्यू यॉर्कमधील वॉल स्ट्रीट बंद करण्याची वेळ आली होती. भारतीय लग्नाची ही वरता जगात चर्चेचा विषय ठरली आहे. 

वॉल स्ट्रीट हे देशाच्या आर्थिक क्रियाकलापांचे केंद्र मानलं जातं आणि हाच रस्ता भारतीयांनी त्याचं खास रूपांतर डान्स फ्लोरमध्ये केलं. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी लग्नाची वरात काढली तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्यात. DJ च्या तालावर 400 लोकांची वॉल स्ट्रीट नाही तर अमेरिका हलवून टाकलं. शेरवानी, सूट, साड्या आणि लेहेंगा परिधान केलेले एवढ्या मोठ्या संख्येने वऱ्हाडी नाचत आणि गाणी म्हणत लग्नाच्या ठिकाणी जायला निघाले होते. या संपूर्ण थाटामाटात वरातीसाठी भरमसाठ खर्च झाला आहे. तुम्ही म्हणत असाल अखेर हे लग्न आहे तरी कोणाचं?

वॉल स्ट्रीटवरील भारतीयांच्या या मिरवणुकीची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडRओ समोर आले आहेत, ज्यात भारतीय वॉल स्ट्रीटवर बेधुंदपणे नाचत आहेत.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वराला चालताना आणि वरातीमध्ये नाचताना तुम्ही पाहू शकता. जेव्हा ही मिरवणूक गगनचुंबी इमारतींमधून गेली तेव्हा तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. डीजे एजे नावाच्या एका वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर या वरातीचा व्हिडीओ पोस्ट केला आणि लिहिले की, ‘आम्ही 400 लोकांच्या वरातीसाठी वॉल स्ट्रीट बंद केलं.’ हा निश्चितच एक अद्भुत क्षण आहे.

केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगातील सर्वात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या लग्नाच्या वरातीचा खर्च कार्यक्रमाच्या ठिकाणावर आणि वेळेवर अवलंबून असतो. परवाना अर्जांसाठी CECM $25 आकारण्यात येतो, पण हा वरातीच्या खर्च विविध घटकांवर अवलंबून असतो.

वरातीसाठी किती खर्च येतो?

लाईव्ह मिंटच्या मते, वरात आयोजित करण्याचा खर्च परमिट शुल्क किंवा रस्ते बंद करणे, पोलीस व्यवस्था, खाजगी सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापन, कार्यक्रम विमा, रसद आणि उपकरणे भाड्याने देणे यावर अवलंबून असेल. वॉल स्ट्रीट किंवा ब्रॉडवे सारख्या हाय-प्रोफाइल क्षेत्रांसाठी, रस्ते बंद करणे आणि संबंधित सेवांचा एकूण खर्च $25,000 ते $60,000 किंवा त्याहून अधिक असतो. 

कोणाची आहे ही वरात?

ही वरात आहे गुजरातमधील वरुण याची. तो रोलई या टेक कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. रोलई हे एक एंटरप्राइझ एआय प्लॅटफॉर्म आहे. हे उच्च शिक्षण संस्थांसाठी डेटा विश्लेषणात्मक कौशल्ये शिकवण्याचे काम करते. 2023 मध्ये वरुणला फोर्ब्स 30 अंडर 30 मध्येही स्थान देण्यात आलं होतं. 

SOURCE : ZEE NEWS