Source :- ZEE NEWS

India Pakistan War: भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. अशातच इस्लामाबादच्या एका धर्मगुरुने पाकिस्तानी सैनिकांवर टीका करत जनरल आसिम मुनीर आणि त्यांच्या कोर कमांडरवर टीका करत त्यांची खिल्ली उडवली आहे. मौलाना गाजी यांनी त्यांच्या राज्यकर्त्यांना म्हणजेच शहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. मौलाना गाजी पुढे म्हणाले की, पाकिस्तानी सैनिक बलूचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये स्वत:च्या लोकांवर अत्याचार करत आहेत. 

त्यांनी पाकिस्तानच्या पोलिसांवर आणि लष्कराला दडपल्याचा आरोप करत त्यांनी अत्याचारांकडे देखील लक्ष वेधले. यावेळी ते बोलत असताना त्यांनी इस्लामाबादच्या लाल मशिदीचे मौलवी मौलाना अब्दुल अजीज गाजी यांनी तिथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांना लढायचे असेल तर हात वर करण्यास सांगितले. तेव्हा एकाही नागरिकाने हात वर केला नाही. सर्वत्र शांतता होती. सध्या याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

भारतासोबत लढण्यास एकही नागरिक तयार नाही

लाल मशिदीतील विद्यार्थ्यांना आणि इतर अनुयायांना संबोधित करताना गाजी म्हणाले की, तुमच्यासाठी माझ्याकडे एक प्रश्न आहे. मला सांगा, जर पाकिस्तानने भारताविरुद्ध लढा दिला तर तुमच्यापैकी किती जण पाकिस्तानला पाठिंबा देतील आणि त्यांच्या विरोधात किती लढतील? त्यावेळी कोणीही हात वर केला नाही. त्यानंतर मौलाना म्हणाले की, याचा अर्थ असा होती की सर्व काही स्पष्ट आहे.  कोणालाही काहीही सांगण्याची गरज नाही. 

यावेळी मौलवी यांनी बलूचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा येथे होणाऱ्या अत्याचारांचा देखील उलघडा केला. त्यासोबतच पाकिस्तानवर आपलेच नागरिक बॉम्ब हल्ला करत असल्याचा आरोप केला. त्यांनी बलूचिस्तानमधील लोकांना जबरदस्तीने गायब केल्याचा मुद्दाही उपस्थित केला. गाजी म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याने खैबर पख्तूनख्वामध्ये जे केलं तेच बलुचिस्तानात घडलं. हे त्यांचे अत्याचार आहेत. या लोकांनी आपल्याच नागरिकांवर बॉम्बस्फोट केले. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान प्रचंड तणावामध्ये आहे. अशातच पाकिस्तानी नेते आता अशी विधाने करत आहेत. 

भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी

पाकिस्तानचे लोक भीतीमुळे प्रचंड रडत आहेत. पाकिस्तानचे स्पष्टवक्ते नेते भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी देत ​​आहेत. असे करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचाही समावेश आहे. त्यांच्या मते, नवी दिल्ली जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर लष्करी हल्ला करू शकते. जर भारताने हल्ला केला तर आम्ही त्याला योग्य उत्तर देऊ. 

SOURCE : ZEE NEWS