Source :- ZEE NEWS
Viral Video : सोशल मीडियावर एका व्यक्तीची विचित्र कहाणी व्हायरल होत आहे. या व्यक्तीने त्याची वाईट सवय सोडण्यासाठी एक नाही तर तब्बल 5 लग्न केली आहे. असं म्हणतात की वेदनेला वेदनेच मात करता येतं. या माणसानेही असं काहीस करण्यासाठी तब्बल 5 लग्न केली. पण या व्यक्तीने केली गोष्ट ही कल्पनापलीकडे आहे. या व्यक्तीला कोणती सवय होती की ज्यासाठी त्याने 5 लग्न केली याबद्दल जाणून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. (man had girlfriend and used to have sex with Girl to break the habit he married 5 times father of 11 children viral news)
नेमकं काय प्रकरण आहे? का केली त्याने 5 लग्न…?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या स्टोरीमध्ये असं सांगण्यात आलं की, या पुरुषाला गर्लफ्रेंड असूनही तो इतर मुलांशी शारीरिक संबंध ठेवायचा. ही वाईट सवय त्याला सोडायची होती. म्हणून त्याने अनोखी पद्धत अवलंबली, त्याने पाच महिलांशी लग्न केले जेणेकरून त्याला इतर कोणाशीही प्रेमसंबंध ठेवण्याची गरज भासू नये. त्याने फक्त 5 लग्न केली नाही तर त्याला या लग्नातून 11 मुलं आहेत.
न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, लॉस एंजेलिसचा रहिवासी जेम्स बॅरेट हा एकेकाळी सिरीयल चीटर होता. त्याने त्याच्या मैत्रिणीची फसवणूक केली आणि सतत इतर महिलांशी संबंध ठेवायचा. स्वतःला बदलण्यासाठी, त्याने एकपत्नीत्व सोडून दिले आणि बहुविवाह स्वीकारला. याचा अर्थ आता तो एकाच वेळी अनेक महिलांशी प्रेमसंबंधात आहे आणि त्यांच्याशी लग्नही केलंय. जेम्स म्हणतो की, अशाप्रकारे त्याने फसवणूक करण्याच्या सवयीवर मात केली आणि दुसरीकडे अनेक जोडीदार असण्याची त्याची इच्छा देखील पूर्ण केली.
30 वर्षीय जेम्स म्हणतो की, अनेक बायका असल्यामुळे त्याला आता बाहेर जाऊन इतर कोणत्याही महिलेसोबत फ्लर्ट करण्याची गरज पडत नाही. त्याला पाच बायका आहेत, 29 वर्षीय कॅमेरून, 31 वर्षीय जेसिका, 28 वर्षीय रीटा, 30 वर्षीय गॅबी, आणि पाचव्या पत्नी 30 वर्षीय डायना असं नाव आहे. जेम्स कॅमेरून आणि जेसिकासोबत सर्वात जास्त काळ म्हणजे जवळजवळ 13 वर्षांपासून आहे, तर डायना ही त्याची सर्वात नवीन पत्नी असून जी गेल्या चार वर्षांपासून त्याच्यासोबत आहे. त्यांना पाच लग्नातून 12 वर्ष ते 11 महिने वयोगटातील 11 मुलं आहेत.
“संघर्षाची भावना होती”
जेम्स म्हणतो की, जेव्हा तो फक्त एकाच मैत्रिणीसोबत होता तेव्हा त्याला सतत स्वतःमध्ये संघर्ष जाणवत असे आणि तो स्वतःशी प्रामाणिक राहत नसल्याचे त्याला जाणवत होतं. पण आता तो अधिक आरामशीर आणि प्रौढ आयुष्य जगणार आहे. मात्र, जेम्स हे देखील कबूल करतो की जरी तो त्याच्या पाच पत्नींसह आनंदी असला तरी, आर्थिकदृष्ट्या इतक्या मोठ्या कुटुंबाचे व्यवस्थापन करणे त्याच्यासाठी एक मोठे आव्हान आहे. असे असूनही, त्याचे संपूर्ण कुटुंब एकमेकांना आधार देऊन एकत्र जीवन सुखाने जगत आहेत.
SOURCE : ZEE NEWS