Source :- ZEE NEWS

काही कुटुंबांमध्ये असे गुपित असतात जे कुटुंबातील सदस्यांसमोर आल्यानंतर अचानक नातेसंबंधांवर त्याचा खोलवर परिणाम होतो. कुटुंब आणि नातेसंबंधातील अशाच गुंतागुंत नात्याची एक गोष्ट एका महिलेने काही काळापूर्वी सोशल मीडियावर सांगितली. त्या महिलेने सोशल मीडियावर आपली अशी एक भीती बोलून दाखवली की, ते पाहून नेटकऱ्यांनाही धक्का बसला. तिने सांगितलं की, मला भीती वाटतंय की, मी माझ्या मुलीला कसं सांगून की तिचा मोठा भाऊ हा तिचा खरा वडील आहे ते…

पती आधीच दोन मुलांचा बाबा

झालं असं की, या महिलेने आपली ओळख लपवत ‘द अटलांटिक’ज डिअर थेरपिस्ट कॉलम’मध्ये लिहिलं की, नवऱ्याला भेटण्यापूर्वी तिच्या पतीला दुसऱ्या महिलेसोबतच्या संबंधातून दोन मुले (एक मुलगा आणि एक मुलगी) आहेत. लग्नानंतर, या जोडप्याने स्वतःची मुलं जन्माला घालण्याचा विचार केला. पण तिच्या पतीची नसबंदी झाल्यामुळे हे शक्य होणार नव्हतं. अशात त्यांना मुलं तर हवं होतं आणि तेही त्यांचा रक्ताचं पण हे नवऱ्याने केलेल्या नसबंदीमुळे शक्य नव्हतं. 

मूल होण्यासाठी निवडला गेला हा अनोखा मार्ग

द मिररच्या बातमीनुसार, महिलेने सांगितलं की, अशा परिस्थितीत तिचं मूल तिच्यासारखं दिसावं यासाठी तिने एक विचित्र उपाय शोधून काढला. द अटलांटिकला लिहिलेल्या पत्रात, त्या अनामिक महिलेने लिहिलं की. ‘आम्हाला स्पर्म बँक वापरायची नव्हती, म्हणून आम्ही माझ्या पतीच्या मुलाचच स्पर्म घेण्याचा निर्णय घेतला. 

तिचा भाऊ हा तिचे वडील…

त्या महिलेने पुढे लिहिलं, ‘आम्हाला वाटले की हा सर्वोत्तम निर्णय होता. अशा प्रकारे आमच्या मुलाला माझ्या पतीचे जीन्स मिळाले. ते कुठल्याही बाहेरील कोणेचीही नव्हतं. आम्हाला माझ्या सावत्र मुलाचे आरोग्य, व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता माहित होती. तो मदत करण्यासही तयार झाला. ती पुढे म्हणाली, ‘आता आमची मुलगी 30 वर्षांची आहे आणि आमच्या मुलीच्या जन्मानंतर आम्ही हे सत्य तीन दशकांपर्यंत लपवून ठेवले आहे.’ आता आपण गोंधळलो आहोत की आपण तिला हे सत्य कसे सांगायचे… तिचे वडील हे तिचे आजोबा आहेत, भाऊ वडील, बहीण ही काकू आणि त्यांचे पुतणे हे तिचे सावत्र भाऊ…ही नात्याची गुंतागुंत तिला कशी सांगायची…’ 

सत्य कळल्यानंतर ती…
तिने सांगितले की, ती आणि तिचा नवरा त्यांच्या मुलीला हे सांगण्याची काळजी करत आहेत आणि ती यावर कशी प्रतिक्रिया देईल हे माहित नाही. “माझ्या पतीसाठीही हे कठीण आहे, कारण तो आमच्या मुलीला हे कळावे अशी त्याची इच्छा आहे की तो तिचा वडील आहे,” 

माफी मागण्यापूर्वी…

महिलेच्या ऑनलाइन पोस्टला उत्तर देताना, मानसोपचारतज्ज्ञ आणि स्तंभलेखिका लोरी गॉटलीब म्हणाल्या की, तिने माफी मागण्यापूर्वी तिच्या मुलीला बसवून प्रकरण योग्यरित्या समजावून सांगावे. 30 वर्षे सत्य लपवल्याबद्दल ‘पूर्ण जबाबदारी घेण्याचे’ आवाहन करून, गॉटलीब म्हणतात की तिने तिच्या मुलीला संभाषणावर वर्चस्व गाजवू द्यावे. मुलीच्या प्रतिक्रियेने तिला आश्चर्य वाटू नये म्हणून त्याने तिच्या भावाशी आधी बोलण्याचा सल्ला दिला. गॉटलीब म्हणाले की हे सर्व सहभागींसाठी सोपे संभाषण नसेल, मात्र त्यांना सत्य माहित असणे महत्वाचे आहे. 

SOURCE : ZEE NEWS