Source :- ZEE NEWS
Viral News : सोशल मीडियावर एका नोकरीच्या पोस्टची तुफान व्हायरल होतो आहे. या पोस्टमध्ये एका जॉब प्रोफाइलबद्दल सांगण्यात आलंय. जर तुम्ही पण नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची असू शकते. या पोस्टमध्ये सांगण्यात आलेला जॉब तुम्हाला मिळाला तर तुमचा पगार हा 84 लाखांचा घरात असणार आहे. विशेष म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कुठल्या पदवीची गरज नाही. या नोकरीत काय खास आहे आणि कोणत्या कामासाठी इतका जास्त पगार दिला जात आहे ते जाणून घेऊया. (Amazing job offer Salary of 84 lakhs for house manager work at dubai Viral News)
खरं तर, दुबईतील एका भरती कंपनीने एक नोकरी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की, दुबई आणि अबू धाबीमध्ये व्हीआयपी क्लायंटसाठी काम करणाऱ्या दोन ‘हाऊस मॅनेजर’साठी उमेदवारांची मागणी करण्यात आली आहे. या कामासाठी दरमहा 30 हजार दिरहम म्हणजेच सुमारे 7 लाख रुपये दिले जाणार आहे. ही नोकरीची पोस्ट दुबईतील प्रमुख घरगुती कर्मचारी आणि खाजगी भरती कंपनी रॉयल मॅन्शनने पोस्ट केली आहे.
रॉयल मॅन्शनने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘नोकरीची संधी: पूर्णवेळ घर व्यवस्थापक.’ तात्काळ भरती. दुबई आणि अबू धाबीमधील व्हीआयपींसाठी आम्हाला दोन हाऊस मॅनेजरची आवश्यकता आहे. आता मोठ्या संख्येने वापरकर्ते या पोस्टवर कमेंट करत आहेत आणि ते म्हणत आहेत की, या कामासाठी ते आपली नोकरी सोडू शकतात.
काय आहे नेमकं काम?
निवडलेल्या घर व्यवस्थापकाला घराच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख करावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांवर देखरेख करावी लागणार आहे. देखभालीचे समन्वय साधावे लागणार आहे. घराचे बजेट व्यवस्थापित करावे लागणार आहे. सर्व काम सुरळीत चालले आहे याची खात्री करावी लागणार आहे.
पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की ‘उमेदवारांकडे संघटनात्मक कौशल्ये आणि विविध कामे वेळेवर पूर्ण करण्याची क्षमता असावी.’ या पोस्टसोबत, एजन्सीने अर्जाची माहिती देखील शेअर करण्यात आली आहे. मात्र उमेदवारांना सध्या खूप कॉल येत असल्याने “कॉल करणे टाळण्यास” सांगण्यात आलं आहे. ही एजन्सी घरगुती सेवांच्या भरतीसाठी ओळखली जाते.
SOURCE : ZEE NEWS