Source :- ZEE NEWS
Viral News : एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक महिला ऑफिसमध्ये लंच ब्रेक झाला म्हणून ती घरी आली. घरातील दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. खरंतर, त्या महिलेचा बॉस बेडवर झोपलेला होता, तोही त्याच्या अंडरवेअरमध्ये. हे दृश्य कोणत्याही हॉरर चित्रपटातील नाही तर जपानच्या फुकुओका प्रांतामधील असून, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, जेव्हा 20 वर्षीय तरुणी दुपारी घरी परतली तेव्हा तिच्या बेडरूममध्ये तिच्या 47 वर्षीय बॉसला फक्त अंडरवेअर घातलेले पाहून तिला धक्का बसला. यानंतर, महिलेने ताबडतोब खोलीचा दरवाजा बंद केला आणि थेट पोलिसांना फोन केला. पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि काही वेळातच आरोपी बॉसला इमारतीजवळ पकडण्यात आले. आरोपीने चौकशीदरम्यान जे सांगितले ते आणखी मनोरंजक आहे. त्या पुरूषाने पोलिसांना सांगितले की, त्याला ती महिला आवडते आणि तो तिला जवळून जाणून घेऊ इच्छित होता. पण ‘तिला जवळून ओळखण्यासाठी त्याने केले कृत्य किती योग्य आहे तपासाचा विषय आहे. त्याहूनही धक्कादायक म्हणजे तो महिलेच्या घरात कसा घुसला.
शेवटी, तो माणूस खोलीत कसा आला?
सध्या पोलीस हे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत की त्याने डुप्लिकेट चावी बनवली होती की, फ्लॅटच्या दारात काही दोष होता. यासोबतच, त्याने महिलेच्या बेडरूममध्ये काही छुपा कॅमेरा बसवला होता का याचाही तपास केला जात आहे. नेटकरी म्हणाले की, आरोपी बॉसला कठोर शिक्षा झाली पाहिजे.
या धक्कादायक घटनेमुळे जपानमध्ये कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळावरील वाद पुन्हा एकदा तापला आहे. बहुतेक नेटिझन्स महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहेत आणि म्हणत आहेत की तिने नोकरी सोडू नये, तर आरोपी बॉसला कठोर शिक्षा झाली पाहिजे. एका युजरने कमेंट केली, जर ती घरी गेली नसती तर तिला बॉसच्या कृत्याबद्दल माहितीच मिळाली नसती. ते आणखी भयानक असू शकले असतं. दुसऱ्या युजरने म्हटलं की, आरोपीचे हेतू बरोबर नाहीत. त्याला सर्वात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.
जपानमध्ये अलिकडच्या काळात कामाच्या ठिकाणी होणारा छळ हा एक चर्चेचा विषय बनला आहे. फेब्रुवारीमध्ये मासाहिरो नाकाई यांनी लैंगिक छळाचा खटला निकाली काढल्यानंतर, जपानी महिलांनी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाच्या त्यांच्या कहाण्या सांगण्यास सुरुवात केली.
SOURCE : ZEE NEWS