Home LATEST NEWS ताजी बातमी अखेरचा मेसेज, सीपीआर आणि मृत्यूची घोषणा; नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणांची डॉक्टरांनी दिली...

अखेरचा मेसेज, सीपीआर आणि मृत्यूची घोषणा; नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणांची डॉक्टरांनी दिली सविस्तर माहिती

4
0

Source :- BBC INDIA NEWS

नाना पाटेकर

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज गोव्यात निधन झालं.

नाना पाटेकर यांच्या निधनापूर्वी त्यांनी अस्वस्थ असल्याचा संदेश मित्राला पाठवला होता.

नानांना पहाटे रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तासाभराहून अधिक काळ सीपीआर देऊनही डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.

मणिपाल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांच्या अखेरच्या क्षणांचा सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचं आज पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी त्यांच्या दोना पावला इथल्या निवासस्थानी तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. बीबीसी मराठीने त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांच्याशी संवाद साधला. मल्हार पाटेकर बीबीसीशी बोलताना म्हणाले की, “ही दुर्दैवी बातमी खरी आहे.”

नाना पाटेकर यांच्यावर ‘शासकीय इतमामात’ अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं घेतल्याचं राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी जाहीर केलंय.

नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ दिनकरराव पाटेकर असं आहे. त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये तसेच नाटकांमध्येही अनेक भूमिका केल्या आहेत.

शॉर्ट व्हीडिओ पाहा

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. नाना पाटेकर यांनी ‘गमन’ या 1978 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केलं होतं.

‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘खामोशी’, ‘अग्निसाक्षी’, ‘नटसम्राट’, ‘वेलकम’ यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची अमीट छाप उमटवली.

मणिपाल हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळुंखे

‘प्रचंड घाम आला होता, जमिनीवर पडले होते’

मणिपाल हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळुंखे यांनी सांगितले,

“आमची रुग्णवाहिका पहाटे 4:20 वाजता नाना पाटेकर यांच्या घरी पोहोचली. त्यांचे निवासस्थान आमच्या रुग्णालयाजवळच आहे. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा ते कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते. त्यामुळे आमच्या पथकाने तात्काळ सीपीआर (CPR) सुरू केले.

सीपीआर सुरू ठेवतच त्यांना 4:30 वाजता रुग्णवाहिकेत हलवण्यात आले. मात्र सकाळी 5:20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य नव्हते, परंतु त्यांचे केअरटेकर आणि मित्र उपस्थित होते.

नाना पाटेकर

रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे या प्रकरणाची मेडिको-लीगल केस म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल.

रात्री सुमारे 2 ते 2:30 वाजण्याच्या दरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्या एका मित्राला आपण अस्वस्थ असल्याचा संदेश पाठवला होता. मात्र उशीर झाल्यामुळे त्या मित्राने तो संदेश पाहिला नव्हता.

तो मित्र पहाटे 4 वाजता त्यांच्या घरी पोहोचला. त्यावेळी नाना पाटेकर यांना प्रचंड घाम आला होता आणि ते जमिनीवर पडलेले होते. त्यानंतर त्यांच्या केअरटेकरने रुग्णालयात येऊन जवळच असलेल्या घरासाठी येथून रुग्णवाहिका नेली.

एक तासाहून अधिक काळ सीपीआर करूनही आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. त्यांना रुग्णालयात आणण्यात आले तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

अधिक शोधा

शॉर्ट व्हीडिओ वगळा आणि पुढे सुरू ठेवा

शॉर्ट व्हीडिओ

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

  • गोवा डॉक्टर

  • आदित्य ठाकरे

  • राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?

  • प्रियांका गांधींना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

  • बिबट्या गावात शिरू नये म्हणून या जंगलात सोडल्या रानकोंबड्या

  • बाणगंगा तलावात अचानक शेकडो मासे का मेले?

  • मांजर आणि सापाच्या मारमारीत कोण जिंकलं?

  • नेहा बोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं

  • थंबनेल

  • थंबनेल

  • कंदील

  • बँकॉकला पुराचा फटका रस्त्यांचं रूपांतर 'फ्लोटिंग मार्केट'मध्ये

  • स्पेसएक्सचं रॉकेट आगीच्या लोळात समुद्रात कोसळलं तो क्षण...

  • कारच्या छतावर बसून पाठलाग, पोलिसांनी जप्त केला 100 किलो गुटखा

  • घरात शिरलेल्या चोराचं गोल्डन रिट्रीव्हरने कसं केलं स्वागत? पाहा

SOURCE : BBC