Home LATEST NEWS ताजी बातमी अमेरिका-इराण चर्चा: स्वित्झर्लंडमध्ये कोण झालं दाखल, आतापर्यंत काय घडलं?

अमेरिका-इराण चर्चा: स्वित्झर्लंडमध्ये कोण झालं दाखल, आतापर्यंत काय घडलं?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रतिनिधी मंडळ

Published

वाचन वेळ: 2 मिनिटे

स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेसाठी दोन्ही देशांचे प्रतिनिधी दाखल झाले आहेत. याशिवाय मध्यस्थ देश असलेल्या पाकिस्तान आणि कतारचे नेतेही स्वित्झर्लंडमध्ये उपस्थित झाले आहेत.

ही चर्चा स्वित्झर्लंडमधील पर्यटनस्थळ बर्गेनस्टॉक या ठिकाणी होणार आहे.

अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स करत आहेत. त्यांच्यासोबत अमेरिकेचे मध्यपूर्वेतील विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे जावई जेरेड कुश्नर यांचाही समावेश आहे.

इराणच्या प्रतिनिधी मंडळात संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा समावेश आहे. यापूर्वी इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेतही त्यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते.

बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी रविवारी सकाळी जेडी व्हान्स आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली.

बीबीसी फारसी सेवेनुसार, इराणी प्रतिनिधी मंडळाची प्रमुख मोहम्मद बगर गालिबाफ यांनी कतारच्या पंतप्रधानांची भेट घेतली असून इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्वित्झर्लंडच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे.

बीबीसी फारसी सेवेनुसार, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या चर्चेत इराण, अमेरिका, कतार आणि पाकिस्तान या चारही देशांचे नेते सहभागी होत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC