Source :- ZEE NEWS
Travel Facts : जगभरात अशी कैक ठिकाणं आहेज, ज्यांची भौगोलिक रचना इतकी कमाल आणि अद्भूत असते की ती ठिकाणं बहुतांश कारणांनी कायमच सर्वांचं लक्ष वेधत असतात. पृथ्वीवरील असंच एक ठिकाण इतकं अद्वितीय आहे की इथल्या नागरिकांना जणू दीर्घायुष्याचं वरदानच लाभलं आहे. असं म्हणतात की इथली माणसं 150 वर्षे जगतात…. जाणून हैराण झालात?
हे खरंय. पृथ्वीवर असणारं हे ठिकाण भारतापासून बरंच जवळ आहे. हे ठिकाण म्हणजे पाकिस्तानातील हुंजा व्हॅली. असं म्हणतात की, इथं राहणाऱ्या नागरिकांचं आयुर्मान 120 ते 150 वर्षे इतकंही असू शकतं. इतक्या वर्षांपासून हे खोरं अनेक रहस्य आपल्या पोटात दडवून आहे, पण आजपर्यंत त्यांच्या दीर्घायुष्याचं सिक्रेट मात्र समोर आलेलं नाही.
तज्ज्ञांनीसुद्धा केलं निरीक्षण…
जाणकार आणि अभ्यासकांच्या मते इथं राहणारे नागरिक जगापासून प्रचंड दूर जणी एक प्रकारच्या एकांतवासातच राहतात. त्यांच्या काही विशेष सवयी त्यांना एका चांगल्या आणि सकारात्मक जीवनशैलीच्या दिशेनं नेतात आणि म्हणून ही मंडळी 70 वर्षांच्या वयातही पंचवीशीइतकी तरुण दिसतात. वयाच्या 65 व्या वर्षीसुद्धा येथील महिलांना गर्भधारणा होते. ज्यामुळं संपूर्ण जगाला एकच प्रश्न पडतो, हे नेमकं कसं शक्यंय? हुंजा व्हॅलीतील नागरिकांना आजारपण स्पर्शही करत नाही. येथील महिला चिरतरुण आणि पुरूष प्रचंड रुबाबदार, देखणे असतात.
हुंजा व्हॅलीत कसं खाणंपिणं असतं?
हुंजा व्हॅलीतील नागरिकांना खुबानी प्रचंड आवडते. अॅप्रिकॉट, किंवा जरदाळू म्हणजेच तिथली खुबानी. असं म्हणतात की या फळांचा रस पिऊन इथले नागरिक दीर्घायुष्य मिळवतात. खुबानीच्या बियांमध्ये एमीग्डालीन नावाटा घटक आढळतो, ज्यामध्ये विटामीन बी 17 चं प्रमाण तुलनेनं जास्त असंत. ज्याच्या सेवनानं नागरिकांना घातक आजार होत नाहीत. येथील नागरिक आहारामध्ये ताजी फळं, भाज्यांना प्राधान्य देतात. तुलनेनं त्यांचा मांसाहार कमी असतो. सर्वात जमेची बाजू म्हणजे मुख्य प्रवाहात नसल्यानं इथं प्रदुषणाचा अंशही नाही, ज्यामुळं या भागातील नागरिकांना श्वसनास शुद्ध हवा उपलब्ध आहे, ज्याचाही सकारात्मक परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.
नेमकं कुठे आहे हे ठिकाण?
हुंजा व्हॅली हे ठिकाण पाकिस्तानच्या उत्तरेकडे एका अतिशय निर्मनुष्य प्रांतात असून, इथलं राहणीमान जणू एखाध्या काल्पनिक कथेप्रमाणंच वाटतं. निसर्गाच्य़ा कुशीत दडलेल्या या ठिकाणी जिथं पाहावं तिथं भारावणारं दृश्य पाहायला मिळतं. मागील काही वर्षांत प्रकाशझोतात आलेल्या या हुंजा व्हॅलीतील दीर्घायुष्याचं गणित मात्र आजही साऱ्या जगासाठी एक मोठं Secret आहे हेच खरं.
SOURCE : ZEE NEWS