Source :- BBC INDIA NEWS

कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये लागलेले वणवे आटोक्यात का येत नाहीयेत?

1 तासापूर्वी

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातल्या लॉस एंजेलिस शहरातील जंगलांमध्ये पसरलेल्या आगीने भयानक स्वरुप धारण केलंय.

या आगीचं क्षेत्र सातत्यानं वाढतच चाललं आहे. आतापर्यंत कमीत कमी सहा जंगले या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही आग विझवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आपला इटलीचा दौरा रद्द केला आहे. राष्ट्राध्यक्ष पदावरुन लवकरच पायउतार होणाऱ्या जो बायडन यांचा हा शेवटचा परराष्ट्र दौरा होता.

SOURCE : BBC