Home LATEST NEWS ताजी बातमी कोकणात पावसाचा जोर कायम, मराठवाड्यात उघडीप; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

कोकणात पावसाचा जोर कायम, मराठवाड्यात उघडीप; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

4
0

Source :- BBC INDIA NEWS

राज्यात पावसाची स्थिती काय? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय असला तरी राज्यभरात पावसाचे चित्र एकसारखे नाही. मागील 24 तासांत कोकणातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली, तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांत हलका पाऊस किंवा पावसाची उघडीप दिसून आली.

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरमध्ये सर्वाधिक 155 मिमी पावसाची नोंद झाली. मंडणगडमध्ये 126 मिमी, खेडमध्ये 115 मिमी, दापोलीत 104 मिमी आणि वाकवली येथे 104.2 मिमी पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुळदे कृषी केंद्रात 136 मिमी, कुडाळमध्ये 131 मिमी आणि कणकवलीत 129 मिमी पाऊस झाला. देवगडमध्ये 100 मिमी तर दोडामार्गमध्ये 90 मिमी पावसाची नोंद झाली.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

रायगड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. म्हसळा येथे 169 मिमी, श्रीवर्धनमध्ये 167 मिमी, तळा येथे 162 मिमी आणि मुरूडमध्ये 151 मिमी पावसाची नोंद झाली. पनवेलमध्ये 119.2 मिमी, माणगावमध्ये 132 मिमी आणि सुधागडमध्ये 111 मिमी पाऊस झाला. पालघर जिल्ह्यात वाडा येथे सर्वाधिक 229 मिमी पावसाची नोंद झाली, तर तलासरीमध्ये 177 मिमी आणि विक्रमगडमध्ये 145 मिमी पाऊस झाला.

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात इगतपुरी येथे सर्वाधिक 69 मिमी पाऊस पडला. सुरगाणा येथे 30 मिमी, पेठ येथे 20 मिमी आणि त्र्यंबकेश्वर येथे 15 मिमी पाऊस झाला. मात्र चांदवड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत आणि देवळा येथे पावसाची नोंद झाली नाही.

मराठवाड्यात पावसाचा जोर तुलनेने कमी राहिला. नांदेड जिल्ह्यात माहूर येथे 40 मिमी, अर्धापूरमध्ये 32 मिमी आणि भोकरमध्ये 30 मिमी पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यात जाफराबाद येथे 13 मिमी, मंठा येथे 8 मिमी आणि बदनापूरमध्ये 4.8 मिमी पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद येथे सर्वाधिक 45 मिमी पाऊस पडला, तर सिल्लोडमध्ये 10 मिमी आणि फुलंब्रीमध्ये 8 मिमी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात पालम येथे 15 मिमी आणि जिंतूर व मानवत येथे प्रत्येकी 10 मिमी पाऊस पडला.

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी येथे 22 मिमी, तर लातूर जिल्ह्यात देऊणी येथे 16 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र अनेक तालुक्यांत अतिशय कमी पाऊस झाला किंवा पाऊस झाला नाही.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची तीव्रता कमी असल्याचे चित्र दिसून आले. सातारा जिल्ह्यात वाई येथे 15 मिमी, खंडाळा-बावडा येथे 13.2 मिमी आणि पाटण येथे 12 मिमी पाऊस झाला.

सांगली जिल्ह्यात कोकरुड येथे सर्वाधिक 14 मिमी पाऊस झाला. शिराळ्यात 11 मिमी, मिरज, आटपाडी आणि कडेगाव येथे प्रत्येकी 7 मिमी पाऊस पडला, तर जत, कवठेमहांकाळ आणि सांख येथे पावसाची नोंद झाली नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यालगतच्या भागांत तुलनेने अधिक पाऊस झाला. गगनबावडा येथे सर्वाधिक 109 मिमी, तर राधानगरी येथे 80 मिमी पावसाची नोंद झाली. चंदगडमध्ये 32 मिमी, आजरा येथे 31 मिमी आणि शाहूवाडी येथे 27 मिमी पाऊस झाला. गारगोटीमध्ये 19 मिमी, कागलमध्ये 12 मिमी आणि गडहिंग्लजमध्ये 10 मिमी पाऊस झाला.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

एकूणच राज्यात कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांत मान्सूनचा जोर कायम असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत हलका पाऊस किंवा उघडीप असल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागाने कोकण आणि घाट परिसरात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

पावसाची स्थिती

फोटो स्रोत, @RMC_Mumbai

दरम्यान, टाटा पॉवरच्या जलस्रोत क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला असून भिरा येथे गेल्या 24 तासांत 249 मिमी पावसाची नोंद झाली. तसेच डोंगरवाडी येथे 140 मिमी, ताम्हिणी येथे 120 मिमी, शिरगाव येथे 110 मिमी आणि धारावी येथे 111 मिमी पाऊस झाला.

नदी पातळीच्या अहवालानुसार, रोहा तालुक्यातील अंबा नदी (नागोठणे बंधारा) 8.20 मीटरवर पोहोचली असून तिने 8 मीटरची इशारा पातळी ओलांडली आहे. मात्र ती अद्याप 9 मीटरच्या धोक्याच्या पातळीखाली आहे. इतर प्रमुख नद्यांची पातळी सध्या इशारा पातळीपेक्षा कमी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सध्या कोणत्याही नदीने धोक्याची पातळी गाठलेली नसली तरी पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

‘या’ ठिकाणी ऑरेंज अलर्ट

राज्यात मान्सूनचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज (1 जुलै) अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. मुंबई, ठाणे रायगड, रत्नागिरी, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील स्थिती कशी?

राज्यात जुलै महिन्यात बहुतांश भागात सरासरीहुन कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मात्र, विदर्भातील बहुतांश तर मराठवाड्यातील तुरळक भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC