Source :- ZEE NEWS

Real Life Choocha: फुकरे (fukrey) या बॉलिवूड चित्रपटात अभिनेता वरुण शर्माने साकारलेली ‘चूचा’ ही व्यक्तिरेखा तुमच्यापैकी बहुतेकांना आठवत असेल. जर नसेल तर आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की या चित्रपटातील ‘चूचा’ (वरूण शर्मा) मध्ये एक विशेष ताकद असते. तो जे काही स्वप्न पाहतो ते सत्यात उतरते. या शक्तीचा वापर करून ‘चूचा’चे मित्र लॉटरीची तिकिटे खरेदी करून भरपूर पैसे कमावतात. चित्रपट जरी काल्पनिक कथांवर आधारित असले तरी एका अमेरिकन महिलेने ‘चूचा’ सारखेच काहीसे केले आहे. तिने नुकतेच लॉटरी जॅकपॉट जिंकला. या महिलेने दावा केला की, तिच्या स्वप्नात लॉटरीचे क्रमांक आले होते.

“मी माझ्या स्वप्नात हा नंबर पाहिला, मग तिकीट विकत घेतले”

मेरीलँड, प्रिन्स जॉर्ज काउंटी या अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने $ 50,000 (सुमारे 42.96 लाख रुपये) ची लॉटरी जिंकल्याचा दावा केला आहे. या महिलेने मेरीलँड लॉटरी अधिकाऱ्यांना सांगितले की डिसेंबरमध्ये तिला एक स्वप्न पडले होते ज्यामध्ये संख्यांची विशिष्ट मालिका तिला वारंवार दिसली होती. हे आकडे 9-9-0-0-0 होते. या स्वप्नानंतर त्यांनी ऑक्सन हिलच्या ‘झिप इन मार्ट’मधून लॉटरीचे तिकीट खरेदी केले. ती महिला म्हणाली, “आम्हाला थोडा उशीर झाला होता आणि मी तिकीट घ्यायला विसरले होते. पण मला माहित होतं की मला या नंबरवर खेळायचं आहे. हे अंक माझ्या स्वप्नात आले होते.” 

हे ही वाचा: Hindu Ritual: महिलांनी नारळ का फोडू नये? याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

पत्नीच्या म्हणण्यावर नवऱ्याचा विश्वास बसत नव्हता

तिचा नादाज खरा ठरला. 20 डिसेंबरच्या संध्याकाळी सोडतीत तिच्या नंबरने तिला 42.96 लाख रुपयांचे बक्षीस मिळून दिले. महिलेच्या पतीला ही बातमी कळताच त्याचा विश्वास बसेना. तो म्हणाला, “माझ्या पत्नीने मला तिकीट दाखवले, पण मला वाटले की हे खरे असू शकत नाही. पण जेव्हा नशीब चमकते तेव्हा ते तुमची वाट पाहत असते. सुदैवाने, आमचे नशीब आमच्या बाजूने होते.” मात्र या पैशाचा वापर कसा करायचा हे अद्याप दोघांनी ठरवलेले नाही.

हे ही वाचा: ‘या’ सौंदर्यवतींने स्वतः केला नाही एकही चित्रपट, पण तरीही असते नेहमी चर्चेत; 49 व्या वर्षीही तिच्यासमोर सुहाना-सारा फेल

पण महिलेच्या पतीने सांगितले की, “तिला जे हवे आहे, ते तीकरेल.” या बक्षीसासह तिने यावेळी आपल्या नातवंडांना खास ख्रिसमस गिफ्ट दिल्याचेही सांगितले. 

SOURCE : ZEE NEWS