Source :- BBC INDIA NEWS

ग्राऊंड रिपोर्ट : बंदूक सोडून पालकत्वाकडे, आत्मसमर्पित ‘नक्षलवादी’ होतायत आई-बाप
Published
नक्षलवादी चळवळीत लग्न करायचं असेल तर नसबंदी बंधनकारक होती, असं माजी नक्षलवादी सांगतात. पण आत्मसमर्पणानंतर अनेकांनी गडचिरोली पोलिसांसमोर इच्छा व्यक्त केली होती ती आई-वडील होण्याची.
गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या अनेक माजी नक्षलवाद्यांची नसबंदी (Vasectomy) जंगलातच करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना कुटुंब आणि मुलांचं स्वप्नं पूर्ण करता येत नव्हतं.
गडचिरोली पोलिसांच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत आतापर्यंत 50 माजी नक्षलवाद्यांची नसबंदी काढण्याची (Vasectomy Reversal) शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यापैकी 14 जण आई-वडील झाले आहेत.
या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात –
- नक्षलवादी चळवळीत नसबंदी का केली जात होती?
- आत्मसमर्पणानंतर कुटुंब आणि मुलांची इच्छा का निर्माण झाली?
- जंगलात नसबंदी करणारे माजी नक्षलवादी कोण होते?
- Vasectomy Reversal सर्जरी कशी करण्यात आली?
- आज या कुटुंबांचं आयुष्य कसं बदललं आहे?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC







