Source :- ZEE NEWS

चायनीज मालचा काहीही भरवसा नाही हे संपूर्ण भारतीयांना माहित आहे. मात्र कदाचित पाकिस्तानला याचा अंदाज नसावा. कारण पाकिस्तानला चीनकडून मिळालेली 5 शस्त्रं फेल ठरली आहेत. याचा प्रत्यय पाकिस्तानला आला आहे. कारण  भारतावर पाकिस्ताननं डागलेली अनेक मिसाईल फेल गेली आहेत. चीनचा माल घेऊन पाकने  फुसका बार काढला आहे. 

भारताने पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करत दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली आहेत. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र चिनी बनावटीचा मिसाईल्सच्या जोरावर भारतावर हल्ला करणारा पाकिस्तान तोंडावर आपटला आहे. कारण पाकने ड़गलेली चीनी बनावटीची क्षेपणात्र फेल ठरली आहेत. भारताच्या पंजाबमध्ये चिनी बनावटीचं मिसाईल आढळलं आहे. तर पाकने वापर केलेलं क्रूझ क्षेपणास्त्रही अयशस्वी ठरलं आहे. 

चीन हा पाकिस्तानचा मित्रदेश आहे. प्रत्येक गोष्टीसाठी पाक चीनवर अबलंबून आहे. चीनकडून पाकिस्तानला मिळालेली कोणकोणती शस्त्र फेल गेलीयत त्यावर एक नजर टाकुयात.

चिनी बनावटीची पाकची कोणती शस्त्रं फेल?

– HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली – निष्प्रभ
– PL-15E क्षेपणास्त्र – फेल
– JF-17 लढाऊ विमान – फेल

भारताने एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पाकने भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकचे हे नापाक प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले. तर दुसरीकडे चिनी बनावटीच्या शस्त्रांनी पाकला तोंडघशी पाडलंआहे. त्यामुळे चिनी मालाच्या भरवशावर पाकचा फुसका बार निघाल्याचं पाहायला मिळालं. 

SOURCE : ZEE NEWS